शाहरुख खान याची क्रेझ कमी होईना… Pathaan सिनेमाच्या कमाईत ११ व्या दिवशी मोठी वाढ

'पठाण' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहाबाहेर गर्दी; गेल्या काही दिवसांपासून मंदावलेल्या कमाईने ११ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

शाहरुख खान याची क्रेझ कमी होईना... Pathaan सिनेमाच्या कमाईत ११ व्या दिवशी मोठी वाढ
Pathaan Box Office Collection Day 11
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 11:35 AM

Pathaan Box Office Collection Day 11 : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. किंग खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार, हे ठाऊक होतं. पण प्रदर्शनानंतर ११ व्या दिवशी देखील शाहरुख खान याची क्रेझ कमी होताना दिसत नाही. महत्त्वाचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील पठाण सिनेमाने अनेक नवीन विक्रम रचले आहेत. ११ व्या दिवशी शनिवार असल्यामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून पठाण सिनेमाच्या कमाईचा आकडा बॉक्स ऑफिसवर मंदावला होता. पण ११ व्या दिवशी पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांनी जाहिर केलेल्या ११ व्या दिवसाच्या आकड्यांनुसार सिनेमाने जवळपास २२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता रविवारी सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल याकडे अनेकांचं लक्ष आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाला देशात आणि जगात चांगलीच पसंती मिळत आहे.

पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने अभिनेता आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमाचे देखील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ‘दंगल’ सिनेमाने बॉक्स ऑफिस 387 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ‘दंगल’ हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. पण पठाणने दंगल सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. (Pathaan Box Office Collection Day)

पठाण सिनेमाने ११ दिवसांत ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.

चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.