युवराजसोबत दीपिका पदुकोणच्या नात्याची चर्चा, ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी दिली होती ‘ही’ कारणे!

क्रिकेटपटू युवराज सिंह आता हेजल कीचबरोबर आपले विवाहित जीवनात आनंदाने जगत आहे. तर, दुसरीकडे दीपिका पदुकोणनेही रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. तथापि, एक काळ असा होता की, युवराज आणि दीपिका पादुकोणच्या नात्याची चर्चा सर्वत्र सुरु होती.

युवराजसोबत दीपिका पदुकोणच्या नात्याची चर्चा, ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी दिली होती ‘ही’ कारणे!
दीपिका-युवराज
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:43 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींच्या क्रिकेटपटूंसोबत अफेअरच्या आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहेत. क्रीडा आणि बॉलिवूडच्या तारा अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या आहेत की, ज्यामुळे कुठल्या ना कुठल्या खेळाडूचे हृदय बॉलिवूडच्या या अभिनेत्रींवर येतेच. असाच एक काळ होता, जेव्हा क्रिकेटर युवराज सिंह (Yuvraj Singh) याचे मन दीपिका पदुकोणसाठी (Deepika Padukone) धडधडत होते (Deepika Padukone And Yuvraj Singh relation and breakup story).

क्रिकेटपटू युवराज सिंह आता हेजल कीचबरोबर आपले विवाहित जीवनात आनंदाने जगत आहे. तर, दुसरीकडे दीपिका पदुकोणनेही रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. तथापि, एक काळ असा होता की, युवराज आणि दीपिका पादुकोणच्या नात्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाने महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह या दोन्ही क्रिकेटपटूंना डेट केले होते.

 दीपिकाच्या सांगण्यावरून माहीने कापले केस

काही मध्यम अहवालांनुसार, युवराज सिंहपूर्वी दीपिका पदुकोणने क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीलाही डेट केले होते. त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नसलं, तरी त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. असे म्हणतात की, केवळ दीपिका पदुकोणच्या सांगण्यावरून माहीने आपले लांब केस कापले होते.

रिपोर्ट्सनुसार महेंद्र सिंग धोनी त्यावेळी दीपिका पदुकोणच्या प्रेमात वेडा झाला होता. दीपिकाने स्वतःला माहीची फॅन म्हटले होते. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांचे संबंध संपुष्टात आल्यानंतर दीपिका पदुकोण हिचे नाव युवराज सिंहशी जोडले जाऊ लागले. अशा परिस्थितीत धोनीने स्वत:ला दीपिकापासून दूर केले आणि मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग केला.

कशी झाली भेट?

युवराज सिंह आणि दीपिका पदुकोण टी-20 वर्ल्ड कप दरम्यान भेटले होते. त्यावेळी भारताने हा सामना जिंकला होता. दीपिका आणि युवीची भेट त्यांच्या कॉमन मित्रांद्वारे झाली आणि दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. दोघेही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. एवढेच नाही, तर दोघेही सिक्रेट डेटना देखील जात असत. तथापि हे संबंध फार काळ टिकले नाहीत (Deepika Padukone And Yuvraj Singh relation and breakup story).

युवराज सिंहने ‘द टेलीग्राफ’ला दिलेल्या दीपिका पदुकोणशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, ‘मी नुकताच दक्षिण आफ्रिकाहून परत आलो होतो आणि त्यावेळी आमची भेट झाली होती. आम्ही एकमेकांना आवडलो आणि आम्हाला एकमेकांबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. आम्ही एकत्र राहू शकू की, नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. काळानुसार ती पुढे निघून गेली आणि मीसुद्धा.’

ब्रेकअपला कारणीभूत ठरल्या ‘या’ गोष्टी

युवराज सिंगच्या या मुलाखतीदरम्यान दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर डेटिंगची चर्चा सुरु झाली होती. याबद्दल बोलताना युवराज म्हणाला की, ‘ती आधी माझ्याबरोबर होती आणि आता ती इतर कोणासोबत तरी आहे. मला वाटते की, ही तिची वैयक्तिक निवड आहे. जर एखाद्या व्यक्तीस एखाद्या नातेसंबंधातून बाहेर पडायचे असेल, तर दुसरा व्यक्ती काहीच करू शकत नाही. मी कोणावरही आरोप करणार नाही.’

युवराज सिंहसोबतच्या नात्याची कबुलीही दीपिका पदुकोणनेही दिली होती. आयबी टाईम्सच्या वृत्तानुसार, दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘युवराज माझ्या कामात सतत अडवणूक करायचा आणि त्यामुळेच आमचे नाते तुटले.’

(Deepika Padukone And Yuvraj Singh relation and breakup story)

हेही वाचा :

Pearl Puri | अभिनेत्याला जामीन नाहीच! पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Must Watch Movies | ‘दिल बेचारा’ ते ‘शेप ऑफ वॉटर’, हॉटस्टारवरील ‘हे’ गाजलेले चित्रपट आवर्जून बघाच!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.