दीपिका पादुकोणची लेकीला दूध पाजताना होतेय अशी अवस्था, व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने विचारला प्रश्न

Deepika Padukone: दीपिका पादुकोण हिला आई झाल्यानंतर येत आहेत अनेक अडचणी... दूध पाजताना अभिनेत्रीची होतेय अशी अवस्था, व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने विचारला असा प्रश्न?

दीपिका पादुकोणची लेकीला दूध पाजताना होतेय अशी अवस्था, व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने विचारला प्रश्न
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 10:16 AM

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने 8 सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास 6 वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी लेकीचं जगात स्वागत केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर दीपिका मोठ्या पडद्यापासून दूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतरचा आनंद आणि अनुभव अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत आहे. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लेकीचा सांभाळ करताना आणि तिची काळजी घेतना… येणाऱ्या अडचणी अभिनेत्रीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सर्वत्र दीपिकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

दीपिका हिने इन्स्टाग्रामवर एका महिलाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सांगायचं झालं तर, नवजात बालकाला दूध पाजताना आईला येणाऱ्या अडचणी दीपिका हिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा बालकाला भूक लागते तेव्हा बाळ डोळं उघडतं आणि आई जेव्हा दूध पाजायला सुरुवात करते तेव्हा बाळाचं लगेच पोट भरतं आणि बाळ लगेच झोपून जातं. प्रत्येक आईला येणारा असा अनुभव सध्या दीपिका देखील अनुभवत आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्रीने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

दीपिका हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला झोपेत असते आणि तिला अचानक भूक लागते. त्यामुळे ती पळत किचनमध्ये जाते आणि पदार्थ घेऊन टेबलवर बसते. एक घास खाल्ल्यानंतर महिला लगेच झोपते. असंच काही नवजात बालकांसोबत देखील होतं. व्हिडीओ शेअर करत दीपिका हिने सर्वांना एक प्रश्न देखील विचारला आहे. ‘मोठी माणसं देखील असं करू लागली तर?’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

दीपिकाने बदललं इन्स्टाग्राम बायो

लेकीला जन्म दिल्यानंतर दीपिका हिने स्वतःचं इन्स्टाग्राम बायो देखील बदललं… फीड.बर्प.स्लीप.रिपीट… असं अभिनेत्रीने लिहिलं आहे. हे एका लहान बाळाचं दिनक्रम आहे आणि प्रत्येक आई स्वतःया दिनक्रमाचा भाग करते. दीपिका आणि रणबीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्याची माहिती दिल्या नंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दीपिका पादुकोण हिचे आगामी सिनेमे

दीपिका पादुकोण हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अजय देवगन, करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.