Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर कशी आहे दीपिकाची प्रकृती? मोठी अपडेट समोर
Deepika Padukone: दीपिका पादुकोण हिने वयाच्या 38 व्या वर्षी दिला मुलीला जन्म, मुलीच्या जन्मानंतर कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच, दीपिका हिने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिका आणि रणवीर यांनी चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुलगी झाली… अशी घोषणा दोघांनी देखील केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनाी दीपिका – रणवीर यांना शुभेच्छा दिल्या.
मुलगी झाल्यानंतर रणवीर आणि दीपिका दोघे आणि कुटुंबियांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. सेलिब्रिटी आणि चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. दीपिका हिने वयाच्या 38 व्या वर्षी मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाची प्रकृती कशी आहे? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.
रिपोर्टनुसार, दीपिका आणि तिच्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. आता दीपिका – रणवीर लेकी पहिली झलक कधी दाखवणार… या प्रतीक्षेत चाहते आहेत. सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. म्हणून दीपिका – रणवीर देखील लेकीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवणार का? अशी देखील चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून दीपिका तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. प्रग्नेंसीमध्ये दीपिकाने अनेक फोटोशूट देखील केले होते. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. सध्या सर्वत्र दीपिका आणि तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे.
दीपिका – रणवीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. तेव्हाच दोघांमध्ये प्रेम बहरलं. दीपिका – रणवीर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. रणवीर आणि दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्न केलं होतं.
दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 2018 मध्ये लग्न झाल्यानंतर 2024 मध्ये दीपिका हिने लेकीला जन्म दिला. दीपिका आता आई झाल्यानंतर अभिनय विश्वात सक्रिय राहिली की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.