दीपिका पादुकोणसोबत लव्ह ट्रँगलमध्ये अडकला होता धोनी; मैत्रीसाठी केला प्रेमाचा त्याग

कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये जेव्हा अभिनेत्री दीपिका पादुकोणने ओपन रिलेशनशिपचा खुलासा केला, तेव्हा सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाचं नाव बऱ्याच सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं होतं. त्यातच एम. एस. धोनी आणि युवराज सिंग हे दोघंही होते.

दीपिका पादुकोणसोबत लव्ह ट्रँगलमध्ये अडकला होता धोनी; मैत्रीसाठी केला प्रेमाचा त्याग
MS Dhoni, Yuvraj Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 2:07 PM

मुंबई : 23 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री दीपिका पादुकोणची डेटिंग लाइफ गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये पती रणवीर सिंगसमोर दीपिका तिच्या डेटिंग लाइफविषयी असं काही बोलली, ज्यानंतर तिला चांगलंच ट्रोल केलं जातंय. रणवीरला डेट करत असतानाच ओपन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा दीपिकाने केला होता. त्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. रणवीर सिंगशी लग्न करण्यापूर्वी दीपिका आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत होते. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका पूर्णपणे खचली होती. मात्र रणबीरला डेट करण्यापूर्वीही दीपिकाच्या आयुष्यात बरीच मुलं आली होती.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी दीपिकाचं नाव भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार एम. एस. धोनीसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर दीपिका आणि युवराज सिंग या दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. एम. एस. धोनी त्यावेळी टी- 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवण्यासाठी चर्चेत होता. त्याचवेळी तो दीपिकाच्या प्रेमात असल्याचंही म्हटलं जात होतं. काही रिपोर्ट्सनुसार, धोनीने दीपिकासाठीचं प्रेम व्यक्त केलं होतं. इतकंच नव्हे तर दीपिकाला टी-20 च्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतच्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर धोनीसाठी चिअर करतानाही पाहिलं गेलं होतं. धोनीने दीपिकाच्या म्हणण्यानुसार आपले केससुद्धा कापले होते, अशीही चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

दीपिका आणि धोनी हे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी साखरपुड्याचाही निर्णय घेतला होता. मात्र तेव्हाच दीपिकाच्या आयुष्यात युवराज सिंगची एण्ट्री झाली. यानंतर धोनीने स्वत:हून माघार घेतली. युवराजसोबतची आपली मैत्री टिकवण्यासाठी धोनीने असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. मात्र युवराज आणि दीपिकाचंही नातं फार काळ टिकलं नाही. माध्यमांसमोर बोलताना दीपिकाने ब्रेकअपचं कारणसुद्धा सांगितलं होतं. युवराज खूप पझेसिव्ह होता आणि माझ्या कामात खूप हस्तक्षेप करायचा, असं दीपिकाने सांगितलं होतं.

ओपन रिलेशनशिपबद्दल काय म्हणाली दीपिका?

रणवीरसोबतच्या नात्याविषयी दीपिका म्हणाली, “सुरुवातीला मी त्याच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल गंभीर नव्हती. मला सिंगल रहायचं होतं. कारण त्याआधीच मी दोन कठीण रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. मला कोणालाच कमिटमेंट द्यायची नव्हती. सुरुवातीला मी रणवीरसोबतही सीरिअस नव्हती. मात्र जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं, तेव्हापासून मी त्याला गंभीर विचार करू लागले होते. मात्र त्यावेळीही आम्ही दोघं ओपन रिलेशनशिपमध्ये होतो. असं असूनही आम्ही दोघं एकमेकांपासून फार लांब राहू शकलो नाही.”

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....