फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रणवीर आणि दीपिकाने बेल्जियमध्ये लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला होता. 14 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्नगाठ बांधली. त्याआधी दोघं एकमेकांना जवळपास सहा वर्षांपर्यंत डेट करत होते. आता फॅमिली प्लॅनिंगविषयी दीपिका व्यक्त झाली आहे.

फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली रणवीर आणि मला..
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 11:40 AM

मुंबई : 4 जानेवारी 2024 | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी ही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. 2012 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना पहायला मिळाली होती. या चित्रपटानंतर दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीत दीपिका-रणवीरने लग्नगाठ बांधली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका रणवीरसोबत फॅमिली प्लॅनिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पती रणवीरसोबत मिळून आपल्या स्वत:च्या कुटुंबाची सुरुवात करण्याविषयी तिने प्रतिक्रिया दिली.

‘वोग सिंगापूर’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका तिच्या आईवडिलांनी केलेल्या संगोपनाविषयी बोलत होती. “मी ज्या लोकांसमोर लहानाची मोठी झाले, माझ्या काकू, काका, फॅमिली फ्रेंड्स.. ते नेहमीच मला सांगतात की मी जराही बदलले नाही. ते आमच्या संगोपनाविषयी अनेकदा बोलतात. या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर बदलणं खूप सोपं असतं. ती हवा डोक्यात जायला वेळ लागत नाही. पण मला माझ्या घरी कोणीच सेलिब्रिटीची वागणूक देत नाहीत. मी माझ्या घरी असताना एक सामान्य मुलगी आणि सामान्य बहीण असते. ही गोष्ट कधीच बदलू नये असं मला वाटतं. माझ्या कुटुंबीयांमुळे माझे पाय जमिनीवर राहतात. हेच मूल्य मला आणि रणवीरला आमच्या मुलांमध्ये रुजवायचे आहेत”, असं दीपिका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

मुलांबद्दल बोलताच दीपिकाला पुढचा प्रश्न तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आला. “तू याबद्दल काही विचार किंवा प्लॅनिंग करतेय का”, असं तिला विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना दीपिका पुढे म्हणाली, “अर्थातच. रणवीर आणि मला लहान मुलं खूप आवडतात. आमच्या स्वत:च्या कुटुंबाची सुरुवात कधीपासून करू शकू, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.”

दीपिकाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती सध्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याआधी ती शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात झळकली होती. या भूमिकेसाठी तिने काहीच मानधन घेतलं नव्हतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.