‘पठाण’ला प्रेक्षकांचं प्रेम मिळत असताना दीपिका पादुकोण हिच्यावर का आली तोंड लपवण्याची वेळ?
'बेशर्म रंग' गाण्यात घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दीपिका पादुकोण हिने का लपवला स्वतःचा चेहरा... व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
Pathaan : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) स्टारर ‘पठाण’ (Pathaan) सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत होता. अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरेलं असा अनेकांनी दावा केला. पण २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहे. प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशी देखील दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील पठाण सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमाने भारतात आतापर्यंत २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला गोळा केला आहे.
परदेशात देखील पठाण नवीन विक्रम रचत आहे. परदेशात सिनेमाने जवळपास ५५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सिनेमा रोज नवीन विक्रम रचत असताना दीपिका पादुकोण स्वतःला थांबवू शकली नाही आणि सिनेमागृहात चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी पोहोचली. पण चाहत्यांची भेट घेण्यासाठी अभिनेत्रीने चेहरा लपवला होता. म्हणून दीपिका तुफान चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
प्रेक्षक पठाण सिनेमाला देत असलेलं प्रेम पाहून दीपिका वांद्रे येथील गेयटी गॅलक्सीमध्ये चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमागृहात चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी दीपिकाने खास हजेरी लावली. सध्या दीपिका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
पहिल्या दिवशी पठाण सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने तब्बल ७० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण तिसऱ्या दिवशी मात्र पठाण सिनेमाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी सिनेमाने ३९ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. चौथा आणि पाचवा दिवस शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाने पुन्हा बॉक्स ऑफिसचवर उंच उडी मारली.
सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.