Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone : प्रसिद्धी, पैसा मिळवण्यापूर्वी कसं होतं दीपिका पादुकोण हिचं आयुष्य? मोठं सत्य समोर

Deepika Padukone : आज रॉयल आयुष्य जगणाऱ्या दीपिका पादुकोण हिचं कसं होतं आयुष्य? खडतर प्रवासाबद्दल अभिनेत्रीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण हिची चर्चा... दीपिका हिचं बॉलिवूडमध्ये नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील वर्चस्व

Deepika Padukone : प्रसिद्धी, पैसा मिळवण्यापूर्वी कसं होतं दीपिका पादुकोण हिचं आयुष्य? मोठं सत्य समोर
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 10:13 AM

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतला की, त्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. असंख्य संकटांचा सामना कराला लागतो. बॉलिवूडमध्ये देखील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांचं कुटुंब इंडस्ट्रीमधील नाही, पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केलं आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दीपिका पादुकोण हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज दीपिका बॉलिवूडची सर्वत्र प्रसिद्ध आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. पण यशाचं उच्च शिखर गाठण्यासाठी दीपिका हिचा संघर्ष फार मोठा होता.

पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवण्यापूर्वी दीपिका हिचं आयुष्य कसं होतं. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीच्या माध्यमातून केला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण आणि तिच्या करियरची चर्चा रंगली आहे.

आयुष्यातील खडतर दिवसांबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा फार कठीण दिवस होते. मी दिवस – रात्र काम करायची आणि सुटकेस घेऊन रात्री कॅबमध्ये झोपायची.. यामुळे माझी आई कायम चिंतेत असायची. मी सुखरुप घरी पोहोचली की नाही… याची काळजी आईला असायची. आता ते दिवस आठवले की खूप छान वाटतं, वाईट काहीही नव्हतं. जे काही केलं स्वतःच्या हिंमतीवर केलं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पती आणि अभिनेता रणवीर सिंग याच्याबद्दल दीपिकाचं वक्तव्य

दीपिका म्हणाली, ‘रणवीर आणि मी कायम आमच्या व्यस्त वेळापत्रकातून एकमेकांसाठी वेळ कढतो. एकमेकांना वेळ द्यायला हवा.. ही गोष्ट कोणत्याही नात्यात फार महत्त्वाची आहे. आम्ही वेळ काढतो आनंद साजरा करतो. कामामुळे आम्हाला वेळ मिळत नाही, पण फार छान वाटतं.’ एवढंच नाही तर, कुटुंबासोबत देखील आम्हाला वेळ व्यतीत करायला आवडतं.. असं देखील दीपिका म्हणाली.

दीपिका पादुकोण हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘फायटर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.