Deepika Padukone | पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यासाठी दीपिका पदुकोण थेट पोलीस ठाण्यात

नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये दीपिका चक्क पोलीस ठाण्यात पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करताना दिसतेय. "सर, माझे पती काल रात्रीपासून बेपत्ता आहेत", असं ती पोलिसांना म्हणताना दिसतेय.

Deepika Padukone | पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यासाठी दीपिका पदुकोण थेट पोलीस ठाण्यात
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 10:12 AM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये दीपिका चक्क पोलीस ठाण्यात पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करताना दिसतेय. “सर, माझे पती काल रात्रीपासून बेपत्ता आहेत”, असं ती पोलिसांना म्हणताना दिसतेय. त्यामुळे नेमकं काय घडलंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या व्हिडीओत दीपिका अत्यंत चिंतेत दिसतेय. त्यानंतर आणखी एका सीनमध्ये रणवीर सिंग पळताना दिसतोय. साऊथ सुपरस्टार रामचरणसुद्धा या व्हिडीओत आहे. याशिवाय अभिनेत्री त्रिशा कृष्णनलाही पोलीस ठाण्यात पाहिलं गेलंय. तिच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट पहायला मिळतोय. हा व्हिडीओ नक्की कसला आहे, याबद्दल अद्याप काहीच स्पष्ट नाही. मात्र त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘लवकरच पडदा उचलला जाईल.’ त्यामुळे रणवीर-दीपिका, रामचरण आणि त्रिशा यांचा हा चित्रपट आहे की वेब सीरिज की जाहिरात, असे विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते मात्र फार उत्सुक झाले आहेत. दीपिका, रणवीर आणि रामचरण या तिघांचा हा चित्रपट असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे, असंही चाहत्यांनी म्हटलंय. सध्या रणवीर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट, शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. तर दुसरीकडे दीपिका दोन मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करतेय. ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ हे तिचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

रामचरण आणि त्रिशा यांचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. RRR च्या यशानंतर रामचरण केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध नाव झालं आहे. त्रिशाने मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या बिग बजेट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या कलाकारांना एकत्र पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.