मुंबई : दीपिका पादुकोण ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. नुकताच शेअर केलेल्या एका खास व्हिडीओमुळे दीपिका पादुकोण ही तूफान चर्चेत आहे. दीपिका पादुकोण हिचा तो व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दीपिका फनी अंदाजामध्ये दिसतंय. जस्ट लुकिंग लाइक अ वाओ..व्हिडीओ दीपिकाने केलाय. आता दीपिका हिचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.
नुकताच दीपिका पादुकोण ही कॉफी विथ करण 8 मध्ये पोहचली. विशेष म्हणजे यावेळी रणवीर सिंह हा देखील दिसला. यावेळी दोघेही मोठे खुलासे करताना दिसले. पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपवर देखील यांनी जाहिरपणे भाष्य केले. कॉफी विथ करण 8 सध्या तूफान चर्चेत आहे. या सीजनमध्ये काही मोठे खुलासे होणार असल्याचे देखील सांगितले जातंय.
कॉफी विथ करण 8 दीपिका पादुकोण थेट म्हणाली की, सुरुवातीला मी रणवीर सिंह याच्याबाबत गंभीर नव्हते. त्यावेळी मी एका वाईट नात्यातून बाहेर आले. त्यावेळी मला फक्त आणि फक्त रणवीर सिंह याच्यासोबत मजाक करायचा होता. दीपिका पादुकोण हिचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. यानंतर दीपिका पादुकोण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.
दीपिका पादुकोण हिला लोक सोशल मीडियावर सतत ट्रोल करताना दिसले. अनेकांनी दीपिका पादुकोण हिला खडेबोल सुनावले. हा वाद सुरू असतानाच आता दीपिका पादुकोण हिने फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. मात्र, आता यावरूनही लोक तिला सुनावताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने मोठा धमाका केला. पठाण या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हाच चित्रपट ठरला. दीपिका पादुकोण आणि शाहरूख खान यांची जोडी प्रेक्षकांनी जबरदस्त आवडते. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय देखील दिसते.