दीपिका पादुकोणचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच लोकांचा संताप, प्रेग्नंट असतानाही..

Deepika Padukone : दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नंट असल्याचे जाहिर केले. सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म देणार आहे. सध्या दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

दीपिका पादुकोणचा 'तो' व्हिडीओ व्हायरल होताच लोकांचा संताप, प्रेग्नंट असतानाही..
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 9:01 PM

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हेच नाही तर विदेशातूनही पाहुण्यांचे आगमन या प्री वेडिंग फंक्शनसाठी झाले. या प्री वेडिंग फंक्शनकडे अख्या जगाचे लक्ष लागल्याचे देखील बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार तयारी ही सुरू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हे प्री वेडिंग फंक्शन पार पडतंय. या फॅक्शनचा तसा आज शेवटचा दिवस आहे.

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री वेडिंग फंक्शनला अख्ये बाॅलिवूड पोहचले. बाॅलिवूडच्या कलाकारांची सतत या फंक्शनमधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकारांना या प्री वेडिंग फंक्शनचे आमंत्रण आहे. फक्त कलाकारच नाही तर त्यांचे घरातील सदस्य हे देखील जामनगरमध्ये दाखल झाले आहेत.

सध्या या प्री वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओनंतर लोक हे दीपिका पादुकोण हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्याकडून मोठी घोषणा ही करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म देणार आहे.

प्री वेडिंग फंक्शनमधील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत नगाडा संग ढोल’ आणि ‘गल्ला गूडिया’ या गाण्यांवर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. दोघेही जबरदस्त असा डान्स नक्कीच करत आहेत. मात्र, दीपिकाने प्रेग्नंसीमध्ये अशाप्रकारचा डान्स करणे हे तिच्या चाहत्यांना अजिबातच आवडले नाहीये.

यावरूनच दीपिका पादुकोण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय. अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही रणवीर सिंह याच्यासोबत दांडिया खेळताना दिसत आहे. या पार्टीमध्ये बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी जबरदस्त डान्स केले आहेत. तीन दिवसांपासून हे प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे. पाहुण्यांसाठी राहण्याची खास व्यवस्था देखील करण्यात आलीये.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.