इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने सहकलाकाराच्या कानाखाली वाजवली; नेमकं काय घडलं?

दीपिकाने म्हटलं होतं की मालिकेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तिने अनससोबतचा गैरसमज दूर केला. मात्र त्या घटनेनंतर दीपिका आणि आपल्यात काहीच ठीक होऊ शकणार नाही, असं अनसने म्हटलं होतं. या वादामुळेच मालिकेचा टीआरपीसुद्धा घसरू लागला होता, असंही तो म्हणाला होता.

इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने सहकलाकाराच्या कानाखाली वाजवली; नेमकं काय घडलं?
Deepika Singh and Anas RashidImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 3:30 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : काही वर्षांपूर्वी स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिया और बाती हम’ ही मालिका सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेतील दीपिका सिंह आणि अनस राशिद यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. जवळपास पाच वर्षे चाललेल्या या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पडद्यावर दीपिका आणि अनस एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसले तरी खऱ्या आयुष्यात ते एकमेकांशी बोलणंही टाळायचे. जवळपास दोन वर्षांपर्यंत या दोघांमध्ये हा वाद सुरू होता. यामागचं कारण म्हणजे मालिकेच्या एका एपिसोडच्या शूटिंगदरम्यान दीपिकाने थेट अनसच्या कानाखाली वाजवली होती.

‘दिया और बाती हम’ या मालिकेतील एक सीनमध्ये ‘सूरज’ (अनस राशिद) आणि ‘संध्या’ (दीपिका सिंह) यांचा रोमान्स दाखवायचा होता. मात्र या शूटिंगदरम्यान दोन्ही कलाकारांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला. असं म्हटलं जातं शूटिंगदरम्यान अनस राशिदने प्रॉडक्शन टीमकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नीट लक्ष दिलं नाही. त्यामुळे ज्या सीनमध्ये त्याला दीपिकाच्या कमरेला पकडायचं होतं, तेव्हा चुकून त्याने तिला समोरून स्पर्श केला. या शूटदरम्यान दीपिका अनकम्फर्टेबल झाली आणि रागाच्या भरात तिने थेट अनसच्या कानाखाली वाजवली.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर सेटवर खूप मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी दीपिका तो शोसुद्धा सोडणार होती. इतकंच नव्हे तर या घटनेनंतर दोघांनी जवळपास दोन वर्षांपर्यंत अबोला धरला होता. हे प्रकरण नंतर इतकं वाढलं होतं की अखेर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनलाही त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. दोघांनी शूटिंग सुरू ठेवलं असलं तरी नंतर कधीच ते एकमेकांसोबत मोकळेपणे वागू शकले नव्हते. याप्रकरणी दोघांनी काही मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दीपिकाने म्हटलं होतं की मालिकेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तिने अनससोबतचा गैरसमज दूर केला. मात्र त्या घटनेनंतर दीपिका आणि आपल्यात काहीच ठीक होऊ शकणार नाही, असं अनसने म्हटलं होतं. या वादामुळेच मालिकेचा टीआरपीसुद्धा घसरू लागला होता, असंही तो म्हणाला होता.

दीपिकाने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यामध्ये तिने संध्याची भूमिका साकारली होती. ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली होती. अखेर सप्टेंबर 2016 मध्ये या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘द रिअल सोलमेट’ या वेब सीरिजमध्ये झळकली. दीपिकाने 2 मे 2014 रोजी तिच्याच मालिकेचा दिग्दर्शक रोहित राज गोयलशी लग्न केलं. 2017 मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. मध्यंतरीच्या काळात ती शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.