मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं. एक काळ असा होता जेव्हा ८० ते ९० च्या दशकात काही अभिनेत्रींनी बॉलिवूडवर राज्य केलं. ९० च्या दशकातील काही अभिनेत्री आज देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्या आज कुठे आहेत, काय करतात? कोणालाही माहिती नाही. बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री दिप्ती नवल (Deepti Naval). दिप्ती नवल यांनी बॉलिवूडमध्ये भरभरू प्रेम मिळालं. लग्न देखील झालं, पण लग्न टिकलं नाही. त्यानंतर दिप्ती नवल यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाच्या एन्ट्री झाली. पण एका गोष्टीमुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं हृदयद्रावक निधन झालं. आज दिप्ती नवल यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेवू…
अभिनेत्री दिप्ती नवल यांचं शिक्षण परदेशात झालं. वडिलांची परदेशात बदली झाल्यामुळे त्यांचं पूर्ण शिक्षण परदेशात झालं. अभिनयासोबतच दिप्ती यांनी स्वतःला दिग्दर्शन, लेखण आणि समाजकार्याक व्यस्त करून घेतलं. त्यानंतर दिप्ती यांनी श्याम बेनेगल यांच्या 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘जुनून’ सिनेमातून एन्ट्री केली. त्यानंतर दिप्ती नवल यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
दिप्ती यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, १९८५ साली त्यांनी दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्यासोबत लग्न केलं. दिप्ती आणि प्रकाश यांची ओळख कामाच्या निमित्ताने झाली होती. काही काळाने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर एका मुलीला दत्तक घेत दिप्ती – प्रकाश यांनी आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन केलं. दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव दिशा झा असं ठेवलं.
काही वर्षांनंतर प्रकाश काही कामाच्या निमित्ताने दिल्ली याठिकाणी गेले, तर दिप्ती मुंबईमध्येच राहिल्या. वेळेनुसार दोघांमध्ये अनेक वाद रंगू लागले. नात्यात सतत वाद होत असल्यामुळे दिप्ती – प्रकाश यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर २००२ साली दिप्ती – प्रकाश यांचा घटस्फोट झाला.
प्रकाश झा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दिप्ती यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. टीव्ही मालिका ‘थोडा आसमां’ दरम्यान त्यांची ओळख अभिनेते विनोद पंडित यांच्यासोबत झाली. काम करत असताना दिप्ती आणि विनोद यांच्यामध्ये प्रेम बहरलं. आयुष्यात विनोद यांची एन्ट्री झाल्यानंतर दिप्ती आनंदी होत्या.
दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असल्याचं अनेकदा समोर आलं. पण शेवटपर्यंत दिप्ती यांच्या आयुष्यात प्रेम राहिलच नाही. दिप्ती यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला जेव्हा विनोद यांना कर्करोगाचं निदान झालं. कर्करोगाशी लढत असताना विनोद पंडित यांचं हृदयद्रावक निधन झालं. विनोद यांच्या निधनानंतर दिप्ती यांनी आयुष्यभर एकटं राहण्याचा विचार केला.