कल्पनेच्या सर्व सीमा ओलांडणारं यश! ‘या’ भन्नाट गाण्याच्या गायिकेचा Video पाहून तुम्ही भावुक व्हाल
Dekh Tuni Bayko : या गाण्याची म्युझिक फक्त म्युझिक नाही तर जादू आहे. या गाण्याचे विनोदी बोल डोळ्यांसमोर जसंच्या तसं चित्र उभं करतात.
जळगाव (खान्देश) : आम्ही तुम्हाला आज एका अहिराणी गायिकेची (Ahirani song singer) माहिती देणार आहोत जी एका गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. एका गाण्यामुळे या गायिकेचं आयुष्यच बदललं. या गायिकेने अनेक सुंदर गाणी आतापर्यंत गायली आहेत. पण ज्या गाण्यामुळे ती सर्वात जास्त लोकप्रिय झाली ते गाणं म्हणजे ‘देख तुनी बायको’ (Dekh Tuni Bayko). या गाण्याची म्युझिक फक्त म्युझिक नाही तर जादू आहे. या गाण्याचे विनोदी बोल डोळ्यांसमोर जसंच्या तसं चित्र उभं करतात. आणि हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा आवाज आपल्याला त्या मजेशीर गाण्याच्या दुनियेत घेऊन जातो. विशेष म्हणजे या गाण्यात गायक जगदीश संधानशिवने देखील आपली चोख भूमिका पार पाडलीय आणि गायिका अंजना बर्लेकर (Anjana Barlekar) यांचा तर विषयच नाही!
‘देख तुनी बायको’ या गाण्याला जगभरातून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 5 कोटी 80 लाख प्रेक्षकांनी हे गाणं यूट्यूबवर पाहिलंय. या गाण्याला मिळालेल्या यशामुळे गाणं लिहिणाऱ्या आणि गाणाऱ्या अंजना बर्लेकर यांचं तर नशिबच पालटलंय. त्यांनी गंमत म्हणून हे गाणं लिहिलं होतं आणि आज याच गंमतीशीर गाण्यामुळे अंजना यांचं आयुष्य बदललंय. अंजना यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
“मला खरंच कल्पना नव्हती की हे गाणं इतकं व्हायरल होणार की जे माझं आयुष्य बदलून टाकणार. आज या गाण्याला साडे पाच कोटी प्रेक्षकांनी पाहिलंय. एका अहिराणी गाण्याला इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचा धन्यवाद मानते”, अशा शब्दांत अंजना बर्लेकरने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
‘गाणं हसतखेळत लिहून दिलं आणि…’
“देख तुनी बायको हे गाणं जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं त्यानंतर लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केला. हे गाणं मी असंच हळतखेळत लिहून दिलं होतं. पण या गाण्याचा लोकांमध्ये खूप क्रेझ होता. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजायचं. लग्न, डिझे, पार्टी अशा प्रत्येक ठिकाणी हेच गाणं वाजायचं”, असं अंजनाने म्हटलंय.
“मला तुम्हाला एक सांगायचं होतं. ‘देख तुनी बायको’चं मेल व्हर्जन ‘देख तुना नवरा’ लवकरच येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा”, असं आवाहन अंजनाने केलंय.
एखादं स्वप्न सहजासहज पूर्ण होत नाही. स्वप्न साकार करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जीव ओतून काम करावं लागतं. या संघर्षाच्या काळात अनेकवेळा अपमान सोसावा लागतो. तो अपमान गिळून पुढे जावं लागतं. दिवस-रात्र मेहनत करावी लागते.
आपल्या या मेहनतीपुढे अखेर नियतीही गुडघा टेकते. चिक्कार संघर्षाचे दिवस संपतात आणि आपल्या यशाची वाटचाल सुरू होते. याच यशासाठी आपण कधीकाळी एकांतात मनसोक्त रडलेलो असतो. प्रचंड मेहनत केलली असते आणि यशाची वाट पाहिलेली असते. हे यश अनेकदा हुलकावनी देतं. हातात आलेला घास निघून जातो. हे यश प्रचंड संयम आणि वाट पाहायला शिकवतं. पण जेव्हा पदरात पडतं तेव्हा भरभरून देतं. असंच काहीसं अहिराणी गाणी बनवणा-या काही कलाकारांच्या बाबतीत घडतंय. त्यांच्या एका गाण्यामुळे त्यांचं आख्खं आयुष्य बदललंय.
‘देख तुनी बायको’ गाण्याचा व्हिडीओ पाहा
‘देख तुनी बायको’ गाण्याचा अर्थ
बघ तुझी बायको कशी नाचत आहे, कशी डोलत आहे, कशी बोलत आहे तिला सासऱ्याचा नाही धाक तिला सासूचा नाही धाक नुसते करते रुबाब आणि शायनिंग मारते
ती सांगते, ही नुसती झक्कास आहे माझा लटका-झटका एकदम वेगळा आहे बरी चांगली दिसत नाही नुसतं पावडर चोपडते आरशातच पाहते आणि पाहत पाहत खूश होते
माय, काय डोक्याला ताप करुन घेतला याने अशी सून आणली, भलतीच दीडशहानी बघ तुझी बायको कशी नाचत आहे….
तिच्या डोक्यावर इतकासा डोंगर आहे स्वत:ला किती सुंदर समजते ऐवढा मेकअप आणि ऐवढा शृंगार तरी दिसतेस तू किती बेकार
तिची चमचम साडी, सँडलपण भारी, पण चालताना ती त्यावर पडून जाते अशी तोंडावर पडली तिची सँडल तुटली, वाटलं तिला मग गिल्टी बघ तुझी बायको कशी नाचत आहे….
नुसती डिझेवाल्याला ही गाणी सांगते एक संपलं की लगेच दुसरं सांगते ही नुसती उड्या मारते आणि स्वत:ला कट्रीना कॅफ समजते माय अशी बाई आहे ही बिनालाजेची हिला सून म्हणायची शरम वाटते बघ तुझी बायको कशी नाचत आहे….
मुलगा बोलतो – माय कास सांगू आता तुला, कुठून पडून गेली ही माझ्या गळ्यात नुसती किटकिट करते माझ्यामागे थंडी लागू देत नाही माझ्या जीवाला घरात मला भांडी घासायला लावते नाही भांडी घासले तर मला खूप मारते सकाळी उशिरा उठते
ऑनलाईन ऑर्डर करते, पिझ्झा, बर्गर मागवते, एकटी एकटी खाते आणि मला मार खाऊ घालते बघ कशी बायको करुन घेतली मी मला जगूही नाही देत आणि ना मरुही देत
अशी कशी बायको करुन घेतली मी, मला जगूही नाही देत आणि मरुही नाही देत कशी नाचत आहे, कशी….