‘ॲनिमल’ सिनेमातील डिलीटेड सीन तुफान व्हायरल, चाहते म्हणाले, ‘या चुकीसाठी माफी…’
Ranbir Kapoor starrer Animal Film: रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' सिनेमातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया हैराण करणाऱ्या, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त डिलीट केलेल्या सीनची चर्चा...
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ (Animal) सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कमाई केली. सिनेमातील अनेक सीनही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता देखील सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ सिनेमातून डिलिट केलेला एक सीन तुफान व्हायरल होत आहे आणि व्हायरल होत असलेल्या सीनने चाहत्यांचं लक्ष देखील वेधून घेतलं आहे. सीन पाहिल्यानंतर चाहते विचार करत आहेत की, सीन सीनेमातून का हटवला. सध्या सिनेमातून डिलिट करण्यात आलेला इंटेन्स सीन तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित होऊन 8 महिने झाले आहेत. तरी देखील चाहत्यामध्ये सिनेमाबद्दल असलेली क्रेझ कमी झाली नाही. आता व्हायरल होत असलेल्या सीनमध्ये रणबीर कपूर नशेत दिसत आहे. अभिनेता स्वतःसाठी ड्रिंक तयार करतो आणि त्यानंतर कॉकपिटच्या दिशेने जातो. त्यानंतर अभिनेता पायलटच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला तेथून जाण्यास सांगतो.
not gonna forgive @imvangasandeep anna for removing this scene in the movie, it’s a pure display of Ranbir showing his silence and agony after k*lling his brother, especially that lifting off at the end 🙏#RanbirKapoor pic.twitter.com/XDl0TMjjgL
— 𝙑 ♪ (@RKs_Tilllast) August 7, 2024
सीनमध्ये रणबीर पायलटच्या सीटवर बसतो आणि सिगारेट पीट विमान चालवताना दिसतो. रणबीर याला विमान चालवताना पाहून त्याची संपूर्ण गँग देखील हैराण होती. सीनमध्ये कोणता लक्ष वेधणारा डायलॉग नाही. पण सीनमध्ये बॅकग्राउंडमध्ये ‘पापा मेरी जान’ गाणं सुरु असताना दिसत आहे.
सध्या सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आङे. सीन पाहिल्यानंतर सिनेमातून सीन हटवण्याची काय गरज होती?असा प्रश्न चाहते दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना विचारत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सीन सिनेमात असता तर सिनेमा आणखी दमदार झाला असता…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सीन हटवल्यामुळे आम्ही कधीच संदीप रेड्डी वांगाला माफ करणार नाही..’ असं नेटकरी म्हणत आहेत.
सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेमातील काही सीन, डायलॉग इत्यादी गोष्टींमुळे अनेकांनी सिनेमाला विरोध केला. पण त्याचा कोणताच परिमाण बॉक्स ऑफिसवर झाला नाही. सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात गर्दी केली.
महत्त्वाचं म्हणजे, ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी एका रात्रीत नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्धीझोतात आली. सिनेमात तृप्तीने रणबीर याच्यासोबत अनेक इंटिमेट सीन दिले आहे. सिनेमानंतर तृप्तीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियते मोठी वाढ देखील झाली.