Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लव्ह जिहाद’वरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली ‘गोपी बहु’; म्हणाली “स्वत: गीतेचा अध्याय..”

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अचानक लग्न करत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. बॉयफ्रेंड शहनवाजसोबत तिने लग्नगाठ बांधली. मात्र मुस्लीम मुलाशी लग्न केल्यामुळे तिला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

'लव्ह जिहाद'वरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली 'गोपी बहु'; म्हणाली स्वत: गीतेचा अध्याय..
Devoleena BhattacharjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:27 AM

मुंबई : अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने ‘गोपी बहु’ची भूमिका साकारून घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अचानक लग्न करत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. बॉयफ्रेंड शहनवाजसोबत तिने लग्नगाठ बांधली. मात्र मुस्लीम मुलाशी लग्न केल्यामुळे तिला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर तिला ‘लव्ह जिहाद’वरून टिकाटिप्पणी ऐकाव्या लागत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देवोलीनाने यावर मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत देवोलीना म्हणाली, “मला माहीत नाही की लव्ह जिहादमागे नेमकं काय सत्य आहे? मात्र सोशल मीडियावर जे काही वाचायला मिळतं त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपला देश धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आपल्याला मिळून-मिसळून राहायला हवं असं सगळं म्हणून गोष्टींवर पडदा टाकता येणार नाही.”

हे सुद्धा वाचा

याविषयी देवोलीना पुढे म्हणाली, “मला माहितीये की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. मी स्वत: मुस्लीम मुलाशी लग्न केलं आहे. मला आतापर्यंत काहीच त्रास झाला नाही. माझं सोडा पण माझ्या कुटुंबातील इतरही काहींनी आंतरधर्मीय लग्न केलं आणि ते आता खूप खुश आहेत. कोणालाच कोणत्या प्रकारची समस्या नाही.”

मुस्लीम मुलाशी लग्न केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना देवोलीनाने सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, “सोशल मीडियावर जे लोक माझे शुभचिंतक असल्याचा दावा करतात, जे सतत मला लव्ह-जिहादवरून टोमणे मारतात, त्यापैकी 100 लोकांना जरी मी विचारलं की गीतेचा एखादा अध्याय वाचून दाखवा, तर बोलती बंद होईल. माझी स्थिती तर सर्वांत वाईट आहे. कारण मला दोन्ही समुदायातील लोकांकडून टोमणे ऐकावे लागत आहेत. माझ्या धर्मातील लोक मला ट्रोल करतात, कारण मी मुस्लीम मुलाशी लग्न केलं. तर शहनवाजच्या धर्माचे लोक मला यासाठी ट्रोल करतात कारण मी लव्ह जिहादवर बोलते आणि मंदिरात जाते. या सर्वांना मी हेच सांगू इच्छिते की हे माझं आयुष्य आहे. मला माहीत आहे की मी काय करतेय. त्यामुळे मला माझं आयुष्य सुखाने जगू द्या.”

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....