रसोड़े में कौन था? गोपी बहूने गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल
गळ्यात मंगळसूत्र, भांगेत सिंदूर.. देवोलीनाचा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण?
गुवाहाटी: साथ निभाना साथिया ही छोट्या पडद्यावरील मालिका खूप गाजली. यातील रसोडे में कौन था, हा डायलॉग तुफान लोकप्रिय झाला. याच मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नुकतीच लग्नबंधनात अडकली. देवोलीनाने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तिने कोणाशी लग्न केलं, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत सिंदूर आणि नववधूच्या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र देवोलीनाचा मिस्ट्री मॅन कोण आहे, हे कोणालाच कळू शकलं नाही.
देवोलीनाच्या हळदीच्या कार्यक्रमाचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता खुद्द तिनेच इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून ही बाब स्पष्ट झाली की देवोलीनाने लग्न केलंय. नववधूच्या रुपात ती एका गाडीत बसलेली पहायला मिळतेय.
यातील एका फोटोमध्ये तिने पतीचा हात हातात घेतला आहे. दोघांची साखरपुड्याची अंगठीही यात पहायला मिळतेय. मात्र पतीचा चेहरा तिने लपवला आहे. देवोलीनाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कुठलीही चर्चा नसताना अचानक तिने कोणाशी लग्न केलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
View this post on Instagram
देवोलीनाच्या अकाऊंटवर अनेकदा विशाल सिंहसोबतचे फोटो पाहिले गेले आहेत. त्यामुळे तिने त्याच्याशी लग्न केलं की काय, असाही प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून देवोलीनाला प्रसिद्धी मिळाली. यात तिने गोपी बहूची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बिग बॉस 14 मध्येही झळकली. बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि देवोलीना यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादामध्ये देवोलीनाने बिग बॉसच्या घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली होती.