‘माझी मुलं मुस्लीम असो किंवा हिंदू..’, शाहनवाजशी लग्न केल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांवर भडकली देवोलीना

मुस्लीम जिम ट्रेनरशी लग्न केल्यामुळे देवोलीना ट्रोल; अभिनेत्रीने अखेर दिलं सडेतोड उत्तर

'माझी मुलं मुस्लीम असो किंवा हिंदू..', शाहनवाजशी लग्न केल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांवर भडकली देवोलीना
Devoleena BhattacharjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 11:27 AM

मुंबई: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 14 डिसेंबर रोजी तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. देवोलीनाच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर तिचा पती नेमका आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली. मात्र काही जणांनी तिला आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलर्सना आता देवोलीनाने उत्तर दिलं आहे.

देवोलीना ही गेल्या दोन वर्षांपासून जिम ट्रेनर शाहनवाजला डेट करत होती. या नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र शाहनवाज मुस्लीम असल्याने देवोलीनाला ट्रोल केलं जातंय. एका युजरने देवोलीनाची खिल्ली उडवल तिला विचारलं की तिची मुलं हिंदू असतील की मुस्लीम? काही वेळानंतर संबंधित युजरने त्याचं ट्विट डिलिट केलं, मात्र त्यावर देवोलीनाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.

हे सुद्धा वाचा

‘माझी मुलं हिंदी असो किंवा मुस्लीम, तुम्ही विचारणारे कोण? तुम्हाला जर मुलांची इतकी काळजी असेल तर बरीच अनाथाश्रमं आहेत, तिथून एखाद्याला मुलाला दत्तक घ्या. तुमच्या हिशोबाने त्याचा धर्म आणि नाव निवडा. माझी पती, माझी मुलं, माझा धर्म, माझे नियम.. तुम्ही विचारणारे कोण’, असा सवाल देवोलीनाने केला.

यापुढे आणखी एक ट्विट करत तिने लिहिलं, ‘मला आणि माझ्या पतीला सोडा, आम्ही आमचं बघून घेऊ. दुसऱ्यांच्या धर्माविषयी गुगल सर्च करण्याआधी तुम्ही तुमच्या धर्मावर लक्ष केंद्रीत करा आणि चांगली व्यक्ती बना. एवढं तर मला नक्कीच माहीत आहे की तुमच्यासारख्या लोकांकडून ज्ञान घेण्याची मला अजिबात गरज नाही.’

देवोलीनाच्या आंतरधर्मीय लग्नामुळे तिचा सख्खा भाऊ अंदीप भट्टाचार्जीदेखील खूश नसल्याचं दिसत आहे. देवोलीनाच्या लग्नानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.