Bigg Boss 17 : ‘दररोज पत्नीचा अपमान करणं..’; अंकिता लोखंडेच्या पतीवर भडकली अभिनेत्री

‘बिग बॉस 17’मधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये विकी सतत अंकितासोबत रागाने बोलताना, तिचा अपमान करताना दिसत आहे. यावरून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने नाराजी व्यक्त केली आहे. तिने विकीवर निशाणा साधत ट्विट केलं आहे.

Bigg Boss 17 : 'दररोज पत्नीचा अपमान करणं..'; अंकिता लोखंडेच्या पतीवर भडकली अभिनेत्री
bigg boss 17 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 11:50 AM

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर सतत चर्चेत आहे. अंकिता आणि विकी ही एकदम परफेक्ट जोडी आहे, असंच त्यांच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना वाटायचं. मात्र त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बिग बॉसद्वारे पहायला मिळतेय. विकी सतत अंकिताचा इतरांसमोर अपमान करताना दिसतोय. या दोघांची दररोज भांडणं होत आहेत. यावरून ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खान विकीची शाळा घेणारच आहे. याशिवाय नेटकऱ्यांनीही त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिनेसुद्धा विकीवर निशाणा साधला आहे. देवोलीनाची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी अनेक विषयांवरून एकमेकांसोबत भांडताना दिसले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विकी सतत अंकिताचा अपमान करताना दिसतोय. गुरुवारी पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला आणि यावेळी विकी थेट म्हणाला, “अंकिता मला तुझी लाज वाटते.” विकीच्या तोंडून हे शब्द ऐकून अंकिताचे चाहतेसुद्धा सोशल मीडियावर भडकले. इतकंच नव्हे तर विकी तिला सुनावतो, “आयुष्यात तू मला काहीच देऊ शकली नाहीस. तर किमान मानसिक शांती तरी दे.” गुरुवारच्या या एपिसोडनंतर नेटकरी विकीवर चांगलेच भडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

देवोलीनाचं ट्विट

‘गोपी बहू’ ऊर्फ देवोलीना हिने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित विकीवर निशाणा साधला आहे. ‘पती-पत्नीमध्ये मतभेद होतच असतात. परंतु दररोज पत्नीचा अपमान करणे, तिला वाईट वागणूक देणं हे अजिबात मनोरंजक नाही आणि हा खेळाचा भागसुद्धा होऊ शकत नाही’, असं तिने म्हटलंय. देवोलीनाच्या या ट्विटवर कमेंट करत अनेकांनी तिची बाजू घेतली आहे. ‘विकीचं अंकितासोबतचं वागणं खरंच अपमानजनक आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘कधी कधी भांडणं होऊ शकतात. पण दररोज हा अंकिताला का सुनावतोय’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.