‘देवों के देव महादेव’ मधील पार्वतीच्या आयुष्यात संकट? लग्नानंतर म्हणाली, ‘काहीही ठिक नाही…’
Sonarika Bhadoria Emotional Post : लग्नाच्या एका महिन्यानंतर 'देवों के देव महादेव' मधील पार्वती म्हणजे अभिनेत्री सोनारिका भदौरिया आयुष्यात सुरु झाल्या अडचणी? अचानक का म्हणाली, 'काहीही ठिक नाही...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...
‘देवों के देव महादेव’ मधील पार्वती म्हणजे अभिनेत्री सोनारिका भदौरिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. होळीच्या दिवशी अभिनेत्री पती विकास याचे चरणस्पर्ष करून गुलाल लावताना दिसली. तेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे, असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला. पण सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते असं काहीही नाही, आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर असं काही लिहिलं आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सोनारिका हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही चांगलं होत नसतं. जे काही आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागेल… माझ्यावर विश्वास ठेवा चांगल्या गोष्टी कधीच सोप्या नसतात. ज्या गोष्टी सहज घडून येतात त्या बरोबर असतीलच असं नाही.’ अभिनेत्रीच्या अशा पोस्टनंतर चाहते देखील हैराण झाले आहेत.
View this post on Instagram
सोनारिका हिने अशी पोस्ट का केली. तिच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी आहेत का? पतीसोबत कोणत्या गोष्टीवरून भांडणं झाली आहेत का? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या एक महिन्यानंतर अशी पोस्ट का केली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सोनारिकाच्या लग्नाला एक महिना पूर्ण
सोनारिका हिने बॉयफ्रेंड विकास याच्यासोबत 18 फेब्रुवारी रोजी राजस्थान याठिकाणी शाही थाटात लग्न केलं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या. सोनारिका आणि विकास यांनी एकमेकांना 8 वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
सोनारिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने तिच्या करियरची सुरुवात ‘तुम देना साथ मेरा ‘ मालिकेतून केली. या मालिकेची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘देवों के देव महादेव ‘ मालिकेत पार्वती या भूमिकेला न्याय दिला. ‘देवों के देव महादेव’ मालिकेमुळेच सोनारिका हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
सोनारिका सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.