Yuzvendra Chahal and Dhanashree: युजवेंद्र चहलसोबतच्या नात्याबाबत अखेर धनश्रीने सोडलं मौन, म्हणाली..

नुकतंच धनश्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अखेर धनश्रीने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Yuzvendra Chahal and Dhanashree: युजवेंद्र चहलसोबतच्या नात्याबाबत अखेर धनश्रीने सोडलं मौन, म्हणाली..
Dhanashree-Yuzvendra Chahal: धनश्री-युजवेंद्र चहलमध्ये सर्वकाही आलबेल नाही? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:03 PM

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) याचं नातं सध्या चर्चेत आहे. नुकतंच धनश्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अखेर धनश्रीने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला आहे. युजवेंद्रनेही यावर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली होती. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं होतं. लग्नानंतर धनश्रीने तिच्या नावापुढे पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव जोडलं होतं. मात्र आता सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या नावापुढे हे आडनाव पहायला मिळत नाही.

धनश्री आणि युजवेंद्रची पोस्ट

‘प्रत्येकाला विनंती आहे की, आमच्या नात्याबद्दलच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया हे तात्काळ थांबवा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. ‘तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या नात्याबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया, या अफवा थांबवा. सर्वांना भरपूर प्रेम,’ अशी पोस्ट युजवेंद्रनंही लिहिली होती.

हे सुद्धा वाचा

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन डान्स क्लासदरम्यान झाली होती. चहलने नृत्य शिकण्यासाठी धनश्री वर्माच्या वर्गात प्रवेश घेतला होता. इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि दोघांनी लग्न केलं. धनश्री वर्मा एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आणि डान्सरही आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबत मिळून अनेक रील्स बनवल्या आहेत. ती पेशाने डॉक्टर आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. धनश्री प्रमाणे नवरा युजवेंद्र चहलही सोशल मीडियावर तितकाच सक्रीय आहे. तो सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.