तर ‘या’ कारणामुळे धनुष-ऐश्वर्या घेतायत घटस्फोट? प्रसिद्ध गायिकेकडून धक्कादायक खुलासा

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने 2022 मध्ये पती धनुषला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध गायिका सुचित्राने दोघांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटामागचं कारण तिने सांगितलं आहे.

तर 'या' कारणामुळे धनुष-ऐश्वर्या घेतायत घटस्फोट? प्रसिद्ध गायिकेकडून धक्कादायक खुलासा
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:08 AM

जवळपास दोन दशकांच्या संसारानंतर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने पती धनुषला घटस्फोट देत असल्याचं दोन वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. 2022 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र या दोघांनी घटस्फोटामागील कारण कधीच स्पष्ट केलं नव्हतं. घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यापासूनच दोघं वेगवेगळे राहत आहेत. आता गायिका सुचित्राने या दोघांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाविषयी काही खुलासे केले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी विवाहित असताना एकमेकांची फसवणूक केली, असं तिने म्हटलंय. मात्र आता ऐश्वर्या धनुषवर फसवणुकीचा आरोप करतेय, असंही तिने सांगितलं आहे.

धनुषने मला फसवलं, असा आरोप ऐश्वर्या करतेय. पण तिनेसुद्धा विवाहित असताना धनुषची फसवणूक केली आहे. हा दुटप्पीपणा झाला ना? ऐश्वर्याने धनुषला फसवलं आणि धनुषने ऐश्वर्याला फसवलं. ही एक अशी जोडी आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा विश्वासघात केला आहे”, असं सुचित्रा म्हणाली. इतके गंभीर आरोप तू कोणत्या आधारावर करतेय, असा प्रश्न विचारला असता तिने सांगितलं की, “ऐश्वर्या आणि धनुष हे विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तींसोबत डेटवर जायचे. ते बारमध्ये बसायचे आणि ज्या व्यक्तीला डेट करत आहेत, त्यांच्यासोबत मद्यपान करायचे. जेव्हा तुम्ही विवाहित असता, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत डेटवर जाणं सर्वसामान्य आहे का?”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतने 18 नोव्हेंबर 2004 रोजी लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. या दोघांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. यात्राचा जन्म 2006 मध्ये तर लिंगाचा जन्म 2010 मध्ये झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांनी आजोबा रजनीकांत यांच्यासोबत राहायला पाहिजे, असंही मत सुचित्राने या मुलाखतीत मांडलं.

17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला होता. ‘मित्र, जोडीदार आणि पालक म्हणून 18 वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर आमचे मार्ग आता वेगळे होत आहेत. आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या’, असं त्यांनी लिहिलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.