AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | ‘ड्राईव्ह’ सिनेमावेळी सुशांतशी वाद झाल्याची चर्चा, धर्मा प्रॉडक्शनच्या अपूर्व मेहतांची चौकशी

ड्राईव्ह सिनेमाबाबत सुशांत सिंह राजपूत आणि धर्मा प्रोडक्शनमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.

Sushant Singh Rajput | 'ड्राईव्ह' सिनेमावेळी सुशांतशी वाद झाल्याची चर्चा, धर्मा प्रॉडक्शनच्या अपूर्व मेहतांची चौकशी
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 4:55 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी (Dharma Productions CEO Apoorva Mehta Statement) करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहताची चौकशी झाली. मुंबई पोलिसांनी अपूर्व मेहताला चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर आज अंबोली पोलीस ठाण्यात अपूर्व मेहतांनी त्यांची साक्ष नोंदवली (Dharma Productions CEO Apoorva Mehta Statement).

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मुंबई पोलिसांनी बॉलिवूडच्या अनेक बड्या लोकांची चौकशी केली. कालच दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी झाली. मुंबई पोलिसांनी धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा करण जोहरलाही समन्स पाठवला आहे. लवकरच करण जोहर या प्रकरणी त्याची साक्ष नोंवण्याची शक्यता आहे. यापूर्वी करणची मॅनेजर रेशमा शेट्टीची साक्षही नोंदवण्यात आली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ड्राईव्ह सिनेमाबाबत सुशांत आणि धर्मा प्रोडक्शनमध्ये वाद

ड्राईव्ह सिनेमाबाबत सुशांत सिंह राजपूत आणि धर्मा प्रोडक्शनमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. पोलिसांनी या सिनेमाबाबत कराराची कॉपी मागवली आहे.,

या सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसली होती. आधी हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर हा सिनेमा NetFlix वर प्रदर्शित करण्यात आला (Dharma Productions CEO Apoorva Mehta Statement).

सुशांतला या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, या सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. या सिनेमाला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं. धर्मा प्रोडक्शनच्या या निर्णयावर सुशांत अत्यंत नाराज होता. या सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार होता की हा निर्णय नंतर घेण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहे.

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणात सुरुवातीपासूनच करण जोहरला ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी करण जोहर जबाबदार असल्याचा दावा केला आहे. अभिनेत्री कंगना रनौत वारंवार करण जोहरवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनच्या सीईओला चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Dharma Productions CEO Apoorva Mehta Statement

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Suicide | करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

घराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र