Dharmaveer 2 Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर 2’ सिनेमाची छप्परफाड कमाई, आकडा थक्क करणारा

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर सध्या फक्त आणि फक्त 'धर्मवीर 2' सिनेमाचा बोलबाला... पहिल्याच दिवशी सिनेमाने मारली इतक्या कोटी रुपयांपर्यंत मजल... कमाईचा आकडा थक्क करणारा...

Dharmaveer 2 Box Office Collection:  पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2' सिनेमाची छप्परफाड कमाई, आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 8:15 AM

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त फक्त ‘धर्मवीर’ सिनेमाची चर्चा होती. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सिनेमा 27 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी देखील सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. शिवाय सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. आकडे पाहिल्यानंतर कळत आहे की, सध्या बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील पहिल्या दिवशी सिनेमाने केलेल्या कमाईचे आकडे जाहिर केले आहे. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी 1.92 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शिवाय आज रविवार असल्यामुळे अधिक कमाई होईल… अशी देखील शक्यता वर्तवली आहे. सध्या सर्वत्र ‘धर्मवीर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. तर सिनेमा 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘धर्मवीर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची जीवनपट उलगडण्यात आला आहे. , ‘धरमवीर’ सिनेमा प्रवीण तरडे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला. तर सिनेमात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तरडे, आणि श्रुती मराठे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

आनंद दिघे यांचं ऑगस्ट 2001 मध्ये ठाण्यातील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ‘धर्मवीर 2’ सिनेमामध्ये त्यांच्या आयुष्याशी आणि राजकीय कारकिर्दीशी निगडीत गोष्टी मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.

म्हणून ABVPचा सुफडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य
म्हणून ABVPचा सुफडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट.
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद.
लाडकी बहीण स्वार्थासाठी, ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर..राज ठाकरेंची टीका
लाडकी बहीण स्वार्थासाठी, ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर..राज ठाकरेंची टीका.
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.