‘धर्मवीर २’ सिनेमा घरबसल्या येणार पाहता, पण कसा आणि कुठे? जाणून घ्या
Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’ सिनेमा अद्याप पाहिला नसेल तर, आता सिनेमा पाहा घरबसल्या... जाणून घ्या कधी आणु कुठे? 'धर्मवीर' सिनेमाच्या यशानंतर प्रत्येकाच्या मनात ‘धर्मवीर २’ सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती... आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा...
‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’, “काय आहे हिंदुत्व? सांगा ना काय आहे हिंदुत्व? अरे 18 पगड जातीजमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे.”, “आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील… असे अनेक लक्षवेधी डायलॉगमुळे ‘धर्मवीर 2’ सिनेमा चर्चेत राहिला. सिनेमा प्रदर्शनाची घोषणा होताच चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली. पण अद्यापही अनेकांनी सिनेमा पाहिलेला नाही. तर तुम्ही देखील सिनेमा पाहिला नसेल तर, तुम्हाला आता घरबसल्या ‘धर्मवीर 2’ सिनेमा पाहता येणार आहे.
‘धर्मवीर 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा आता चाहत्यांना ओटीटीवर पाहता येणार आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत ‘धर्मवीर 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
एक फोटो पोस्ट करत प्रसाद ओक कॅप्शनमध्ये . ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची आहे ही गोष्ट… पाहा धर्मवीर २ फक्त ZEE5 वर…’ असं लिहिलं आहे. प्रसाद ओक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याची घोषणा केली आहे.
‘धर्मवीर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची जीवनपट उलगडण्यात आला आहे. , ‘धरमवीर’ सिनेमा प्रवीण तरडे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला.
आनंद दिघे यांचं ऑगस्ट 2001 मध्ये ठाण्यातील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ‘धर्मवीर 2’ सिनेमामध्ये त्यांच्या आयुष्याशी आणि राजकीय कारकिर्दीशी निगडीत गोष्टी मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.