विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘धर्मवीर 2’ची घोषणा? काय म्हणाले निर्माते?

धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून 'धर्मवीर 2'ची घोषणा? काय म्हणाले निर्माते?
निर्माते मंगेश देसाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 11:23 AM

येत्या 9 ऑगस्ट रोजी ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र हा चित्रपट राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात असल्याची टीका काहींनी केली. निवडणुकीत फायदा व्हावा, या उद्देशाने हा चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याचं म्हटलं गेलं. त्यावर आता निर्माते मंगेश देसाई यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “धर्मवीरच्या पहिल्या भागाच्या वेळीही असंच बोललं गेलं. असं सगळं घडणार होतं, म्हणून ‘धर्मवीर’ प्रदर्शित केला, असं म्हटलं गेलं. पण तसं काहीच नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांनी जे किस्से सांगितले, त्याचं 72 तासांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. हे सर्व एका भागात कसं दाखवायचं, म्हणून आम्ही ‘धर्मवीर 2’ काढायचं ठरवलं होतं. त्याबद्दल माझी प्रवीण तरडेंसोबत चर्चा झाली होती. पहिल्या भागाचं शूटिंग साडेचार तासांचं झालं होतं. त्यापैकी तीन तासांचा चित्रपट तुम्ही पाहिला, मग उरलेल्या दीड तासाचं काय करायचं? त्या दीड तासात असे बरेच किस्से आहेत, जे प्रेक्षकांसमोर यायला हवेत.”

“पहिल्या भागाच्या वेळीच आमचं ठरलं होतं की दुसरा भागही शूट करायचा. एका पुरस्कार सोहळ्यात प्रवीणने मला सांगितलं की दुसऱ्या भागाची रुपरेषा तयार आहे. आपण पहिल्या भागातील बऱ्याच गोष्टी वापरू शकतो. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की, तुला योग्य वाटत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठीच आपण दुसरा भाग करतोय, तर मला त्यात अजिबात रस नाही. दुसऱ्या भागासाठी ते सीन्स योग्य बसत असतील आणि तुझं स्क्रिप्ट असेल तरच ते आपण करुयात. तेव्हा आम्ही दुसऱ्या भागाच्या तयारीला सुरुवात केली”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.