Dharmendra | सनी देओल यांच्यामुळे झालं हेमा मालिनी – धर्मेंद्र यांचं लग्न! अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा

हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याआधी धर्मेंद्र आणि पहिल्या पत्नीमध्ये झाला होता करार? नक्की काय आहे सत्य... खुद्द धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीकडून मोठा खुलासा

Dharmendra | सनी देओल यांच्यामुळे झालं हेमा मालिनी - धर्मेंद्र यांचं लग्न! अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 1:06 PM

मुंबई | अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पुर्ण झाली आहे. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नानंतर आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. अशात नुकताच अभिनेते सनी देओल यांच्या मुलाचं लग्न झालं. पण देओल कुटुंबाच्या मुलाच्या लग्नात धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब उपस्थित नव्हतं…

धर्मेंद्र यांनी जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. शिवाय अनेक चर्चा देखील रंगल्या. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर झगमगत्या विश्वापासून दूर असतात. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं होतं, तेव्हा प्रकाश कौर यांनी मोठे खुलासे करत खंत व्यक्त केली होती..

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्यामध्ये एक करार झाला होता.. त्या करारानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झाल्याची चर्चा रंगली होती.. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचं असेल तर, सनी देओल याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करावं लागेलं.. अशी चर्चा रंगली होती…

रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत प्रकाश कौर म्हणाल्या, ‘असं काहीही झालं नव्हतं. सनी देओल तर धर्मेंद्र यांचा देखील मुलगा आहे.. मुलाचं चांगलं व्हावं असंं प्रत्येक वडिलांना वाटतं…’ एवढंच नाही तर धर्मेंद्र यांना ट्रोल करणाऱ्यांना देखील प्रकाश कौर यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं..

धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रकाश कौर म्हणाल्या, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकजण स्त्रीलंपट म्हणू लागले होते. कोणी माझ्या पतीला असं का म्हणू शकतं? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी असंच केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि ते दुसरं लग्न करत आहेत…’

‘धर्मेंद्र चांगले पती होवू शकले नाहीत. पण माझ्यासाठी ते प्रचंड चांगले होते.. ते एक उत्तम वडील आहेत…’ असं देखील प्रकाश कौर मुलाखतीत म्हणाल्या. शिवाय हेमा मालिनी यांच्या जागी मी असते, तर मी असं कधीच केलं नसतं… अशी खंत देखील धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रकाश कौर यांनी व्यक्त केली..

धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत..

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.