Dharmendra यांचा वाढदिवस, हेमा मालिनी यांनी पतीला केलं किस, दोघांचे Unseen फोटो व्हायरल

Dharmendra : धर्मेंद्र यांनी 88 वा वाढदिवस दुसऱ्या पत्नीसोबत केला साजरा... हेमा मालिनी यांनी पतीला केलं किस, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे Unseen फोटो सोशल मीडियावर व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा...

Dharmendra यांचा वाढदिवस, हेमा मालिनी यांनी पतीला केलं किस, दोघांचे Unseen फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 9:47 AM

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. धर्मेंद्र फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. नुकताच धर्मेंद्र यांनी 88 वा वाढदिवस साजरा केला. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाची चर्चा सुरु आहे. अनेकांनी धर्मेंद्र यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींनी धर्मेंद्र यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. हेमा मालिनी यांनी पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री आणि धर्मेंद्र आनंदी दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या गालाला किस घेताना दिसत आहेत, तर इतर दोन फोटोंमध्ये धर्मेंद्र त्यांच्या दोन मुलींसोबत दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

हेमा मालिनी यांनी पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांनी त्यांच्या दोन्ही कुटुंबासोबत मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा केला. एवढंच नाही तर, कुटुंबातील सदस्यांनी धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नातं

धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता सर्व मर्यादा ओलांडत अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 43 वर्ष झाली आहेत. पण अद्याप हेमा मालिनी यांनी पतीच्या मुख्य घरी प्रवेश केलेला नाही.

अनेक मुलाखतींमध्ये देखील हेमा मालिनी यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे केले. हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच, हेमा मालिनी यांचा देखील वाढदिवस झाला पण त्यांच्या वाढदिवसासाठी अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल उपस्थित नव्हते. ज्यामुल देओल कुटुंब तुफान चर्चेत आलं होतं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.