Dharmendra | हेमा मालिनी यांच्या एन्ट्रीनंतर पहिल्या पत्नीला विसरले धर्मेंद्र, अनेक वर्षांनंतर एकत्र आले पण…

१९ व्या धर्मेंद्र अडकले विवाहबंधनात, हेमा मालिनी यांच्या एन्ट्रीनंतर नात्याला तडा, अनेक वर्षांनंतर पहिल्या पत्नीसोबत दिसले अभिनेते... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Dharmendra | हेमा मालिनी यांच्या एन्ट्रीनंतर पहिल्या पत्नीला विसरले धर्मेंद्र, अनेक वर्षांनंतर एकत्र आले पण...
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 10:42 AM

मुंबई | अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं गर्लफ्रेंड द्रिशा अचार्या हित्यासोबत लग्न झालं आहे. करण आणि द्रिशा यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. १८ जून रोजी करण आणि द्रिशा यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली असून त्यांच्या लग्नातील आणि रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा रंगत आहे. लग्नात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते पण सर्वांचं लक्ष धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याकडे होतं. लग्नाआधी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. पण धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब म्हणजे पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली करण आणि द्रिशा यांच्या लग्नात उपस्थित नव्हत्या…

पण लग्न सोहळ्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये धर्मेंद्र अनेक वर्षांनंतर पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत दिसले. दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. फोटो पाहून अनेक चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

फोटोमध्ये ८७ वर्षीय धर्मेंद्र प्रकाश कौर यांच्यासोबत दिसत आहेत. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. फोटोमध्ये दोघे आनंदी देखील दिसत आहे. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी १९५४ मध्ये लग्न केलं. तेव्हा धर्मेंद्र फक्त १९ वर्षांचे होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाला जवळपास ७० वर्ष झाली आहेत.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या चार मुलं आहेत. पण धर्मेंद्र यांनी २५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि जेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी यांची अभिनेत्याच्या आयुष्यात एन्ट्री झाली तेव्हा सर्वत्र चर्चांना उधाण आलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाची सुरुवात ‘तुम हसीन मैं जवान’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. दोघांमध्ये प्रेम बहरल्यानंतर धर्मेंद्र – हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.. तर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींचं नाव ईशा आणि अहाना देओल असं. हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींचं लग्न झालं आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर देखील हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत. शिवाय धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने आद्याप हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही. पण ईशा देओल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण आणि द्रिशा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.