Hema Malini यांनी फोन करुन धर्मेंद्र यांना सांगितलं, ‘तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेलच…’

हेमा मालिनी आणि धमेंद्र यांच्या लव्हस्टोरीबद्दल मोठी गोष्ट अखेर समोर, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक फोन करुन धर्मेंद्र यांना घातली लग्नाची मागणी... त्यानंतर अभिनेत्याने दिलेलं उत्तर म्हणजे...

Hema Malini यांनी फोन करुन धर्मेंद्र यांना सांगितलं, 'तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेलच...'
Dharmendra Hema Malini Affair
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 12:34 PM

Dharmendra Hema Malini Affair : प्रेम एक अशी भावना आहे… जी कधीही विसरता येत नाही… बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच लव्हस्टोरी पैकी एक अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची आहे. जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या तेव्हा कुटुंबासोबत अनेकांनी त्यांच्या नात्याचा विरोध केला. पण होणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष करत हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेमाला अधिक महत्त्व दिलं. आज हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरीही त्यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. (Dharmendra Hema Malini Affair)

हेमा मालिनी यांनी एका चॅट शोमध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. हेमा मालिनी म्हणाल्या, धर्मेंद्र दिसायला प्रचंड स्मार्ट आणि गुड लुकिंग होते. धर्मेंद्र यांच्यासोबत आपलं लग्न होईल असं हेमा यांना कधी वाटलंच नव्हतं. शिवाय हेमा मालिनी यांच्या आई -वडिलांना देखील त्यांचं नातं मान्य नव्हतं. कारण धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं. पण हेमा आणि धर्मेंद्र यांच्यात असलेलं नातं इतकं घट्ट झालं होतं, की अभिनेत्री दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचारच करु शकत नव्हत्या.

हेमा मालिनी यांनी चॅट शो ‘रोंदेवू विद सिमी ग्रेवाल’ मध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं, रिलेशनशिपमध्ये धर्मेंद्र आणि हेमा इतक्या पुढे आले होते, की दोघे मागे वळून पाहूच शकत नव्हते. अशात एक दिवस हेमा यांनी धर्मेंद्र यांना फोन केला आणि सांगितलं की, ‘तुम्हाला माझ्या सोबत लग्न करावंच लागेल…’ पुढे धर्मेंद्र यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. (dharmendra hema malini marriage story)

हे सुद्धा वाचा

नात्यामध्ये आलेल्या अनेक चढ – उतारांनंतर हेमा आणि धर्मेंद्र यांनी १९८० साली लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. पण लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. नव्या घरात दोघांनी संसाराला सुरुवात केली. (hema malini movies)

अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. (dharmendra first movie)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.