बॉलिवूड पदार्पणापूर्वी नातवाला धर्मेंद्र यांच्याकडून मोलाचा सल्ला; म्हणाले “सनीसारखं बनू नकोस कारण..”

अभिनेता सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू राजवीर देओल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. या पदार्पणापूर्वी धर्मेंद्र यांनी नातवाला मोलाचा सल्ला दिला आहे. ट्रेलर लाँचदरम्यान राजवीरने याविषयीचा खुलासा केला.

बॉलिवूड पदार्पणापूर्वी नातवाला धर्मेंद्र यांच्याकडून मोलाचा सल्ला; म्हणाले सनीसारखं बनू नकोस कारण..
बॉलिवूड पदार्पणापूर्वी नातवाला धर्मेंद्र यांच्याकडून मोलाचा सल्लाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 12:21 PM

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओलसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरलंय. आधी त्याचा मुलगा करण देओल विवाहबंधनात अडकला. त्यानंतर सनीचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस तुफान गाजला. आता सनीचा दुसरा मुलगा राजवीर देओल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. सनी देओल आणि पूजा देओल यांचा मुलगा राजवीर देओल आगामी ‘दोनो’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी आजोबा आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी राजवीरला मोलाचा सल्ला दिला आहे. ‘दोनो’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान राजवीरने याविषयी सांगितलं.

धर्मेंद्र यांचा नातवाला सल्ला

तुझ्या पदार्पणाबाबत आजोबा धर्मेंद्र यांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारला असता राजवीर म्हणाला, “ते खूप खुश होते. ते मला म्हणाले, राजवीर तू जसा आहेस तसाच राहा. तुझं व्यक्तिमत्त्व खूप चांगलं आहे. त्यामुळे तुझं ओरिजिनल व्यक्तिमत्त्वच लोकांसमोर येऊ दे. कोणालाच कॉपी करू नकोस. तुझ्या वडिलांच्या प्रतिमेकडे पाहू नकोस. तुझ्या वडिलांसारखं, आजोबांसारखं किंवा काकासारखं बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझं संगोपन खूप चांगलं झालं आहे. त्यामुळे तू जसा आहेस, तसाच रहा.”

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा

‘दोनो’ या चित्रपटाच्या ट्रेलरदरम्यान धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओसुद्धा दाखवला गेला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी राजवीरला शुभेच्छा दिल्या होत्या. धर्मेंद्र म्हणाले, “सनीने मला एके दिवशी सांगितलं की आपला राजवीर चित्रपटात पदार्पण करणार आहे. मी खुश झालो. राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट आहे, त्यामुळे मी निश्चिंत होतो. खूप चांगला चित्रपट बनणार. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. राजवीर आणि पालोमा हे नवीन कलाकार आहेत. एका नव्या कलाकाराच्या मनात किती अपेक्षा आणि त्यांची काय स्वप्नं असतात, हे मला माहीत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचा चित्रपट हिट ठरू दे. राजश्री प्रॉडक्शनचा आणखी बोलबाला होऊ दे.”

पहा ट्रेलर

‘दोनो’ या चित्रपटात राजवीर देओलसोबत पालोमा ढिल्लनची मुख्य भूमिका आहे. पालोमा ही अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अवनिश बडजात्या करणार आहे. अवनिश हा प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा आहे. राजवीर आणि पालोमाप्रमाणेच अवनिशचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.