Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’चं यश पाहून धर्मेंद्र झाले खुश; चाहत्यांसाठी लिहिली खास पोस्ट

शुक्रवारपासून रविवारपर्यंत उत्तर भारतातील जवळपास सर्व शहरांमधील थिएटर्स हाऊसफुल्ल होते. बॉलिवूड चित्रपटांबद्दलची क्रेझ कमी झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हीच क्रेझ ‘गदर 2’मुळे पुन्हा पहायला मिळतेय.

Gadar 2 | सनी देओलच्या 'गदर 2'चं यश पाहून धर्मेंद्र झाले खुश; चाहत्यांसाठी लिहिली खास पोस्ट
Dharmendra and Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 8:34 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : सध्या बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचा धमाका पहायला मिळतोय. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 22 वर्षांपूर्वीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तारा सिंग आणि सकिनाची लव्ह-स्टोरी हिट ठरतेय. या बंपर यशानंतर फक्त निर्माते आणि कलाकारच नाही तर सनी देओलचे वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्रसुद्धा खूप खुश झाले आहेत. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर फुलांच्या गुच्छांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मित्रांनो, गदर 2 या चित्रपटाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार. देवाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनीच या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवलंय.’ धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारपासून रविवारपर्यंत उत्तर भारतातील जवळपास सर्व शहरांमधील थिएटर्स हाऊसफुल्ल होते. बॉलिवूड चित्रपटांबद्दलची क्रेझ कमी झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हीच क्रेझ ‘गदर 2’मुळे पुन्हा पहायला मिळतेय. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 2023 या वर्षांत ‘पठाण’ने नवे विक्रम रचले. त्यानंतर आता ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं आहे.

‘गदर 2’ची आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 40.10 कोटी रुपये शनिवार- 43.08 कोटी रुपये रविवार- 51.70 कोटी रुपये एकूण- 134.88 कोटी रुपये

लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात बरेच बॉलिवूड चित्रपट अपयशी ठरले. त्याच वेळी दाक्षिणात्य चित्रपटांची लाट आली. ‘पठाण’शिवाय ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा शोज हाऊसफुल होऊ लागले आहेत.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.