Hema Malini Birthday : हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण, तरीही चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी

Hema Malini Birthday : धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी आजपर्यंत कधीच नाही गेल्या हेमा मालिनी, चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी... आज हेमा मालिनी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल रंगत आहेत अनेक गोष्टी...

Hema Malini Birthday : हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण, तरीही चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी
हेमा मालिनी, धर्मेंद्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 3:40 PM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. हेमा आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी देखील धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी आजपर्यंत हेमा मालिनी कधीच गेल्या नाहीत. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबासोबत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली कधीही दिसत नाहीत. अभिनेते सनी देओल यांच्या मुलाच्या लग्नात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. पण धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब एका कार्यक्रमात दिसलं नाही. ज्यामुळे तुफान चर्चा रंगल्या. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नात कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.

सवतीच्या घराची पायरी चढल्या नाहीत हेमा मालिनी

विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्यासाठी खास स्थान होतं. अखेर समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. ७५ वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये खुलासा केला की, ही परंपरा एकदा ईशा देओल हिने मोडली होती.

धर्मेंद्र यांचे भाऊ अजीत देओल यांची प्रकृती २०१५ साली खालावली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी ईशा आणि अहाना दोघी प्रकाश कौर यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा अभिनेता सनी देओल याच्यासोबत प्रकाश कौर यांना ईशा पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा ८७ वर्षीय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने दोघींवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं.

हे सुद्धा वाचा

हेमा मालिनी यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं धर्मेंद्र यांच्यासोबत नातं

मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर खऱ्या आयुष्यात देखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर हेमा यांच्या आई-वडिलांनी लेकीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सेटवर देखील हेमा यांच्यासोबत वडील असायचे.

हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे आई – वडील त्यांच्यावर पाळत ठेवत होते. कारण धर्मेंद्र यांनी आपल्या लेकीपासून दूर राहवं अशी त्यांची इच्छा होती. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, तेव्हा धर्मेंद्र विवाहित होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.