रात्री येते जाग, झोप लागत नाही… धर्मेंद्र यांचा असा फोटो, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

Dharmendra Health | 'कधी कधी आयुष्यात असे दिवस येतात...', धर्मेंद्र यांचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त... कशी आहे धर्मेद्र यांची प्रकृती? धर्मेंद्र याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... पाहा फोटो...

रात्री येते जाग, झोप लागत नाही... धर्मेंद्र यांचा असा फोटो, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 12:22 PM

मुंबई | 1 मार्च 2024 : वय वाढू लागलं, तर आजार देखील डोक वर काढतात. उतार वयात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेते धर्मेंद्र याचा एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये धर्मंद्र यांना पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे. खुद्द धर्मेंद्र यांनी मध्यरात्री 3:52 स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे.

धर्मेंद्र यांनी एक्स म्हणजे ट्विटर हँडल (X) वर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये धर्मेंद्र झोपेत दिसत आहेत. त्यांच्या हातात एक प्लेट आहे. फोटो पोस्ट करत धर्मेंद्र म्हणाले, ‘मध्य रात्र झाली आहे… झोप येत नाही… भूक लागते… मित्रांनो शिळी चपाती आणि तूप प्रचंड स्वादिष्ट लागत आहे…’ सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेला फोटो आतापर्यंत 38 हजारपेक्षा अनेकांनी पाहिला आहे. चाहते फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मस्त सर, देव तुम्हाला उत्तम आरोग्य देवो.’ तर फिरोझ मिर्झा नावाच्या एका चाहत्यांने विचारलं, ‘सर तुमच्या पायाला काय झालं आहे?’ चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत धर्मेंद्र म्हणाले, ‘फ्रॅक्चर झालं आहे. पण तुमच्या प्रार्थनेमुळे लवकरच ठिक होईल…’

धर्मेंद्र यांचे सिनेमे

वयाच्या 88 व्या देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून धर्मेंद्र चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची तुफान चर्चा रंगली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली. सिनेमात अभिनेत्री जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होते.

धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच अभिनेत्री ईशा देओल हिचा घटस्फोट झाला. तेव्हा देखील धर्मेंद्र तुफान चर्चेत आले होते. लेकीचा अनेक वर्षांचा संसार मोडल्यामुळे धर्मेंद्र दुःखी होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.