धर्मेंद्र यांनी मध्यरात्री फोटो पोस्ट करत चाहत्यांनी दिली अशी बातमी, दुसरी बातमी म्हणजे…
Dharmendra | धर्मेंद्र यांनी मध्यरात्री चाहत्यांसोबत शेअर केल्या दोन बातम्या, पहिल्या बातमीबद्दल माहिती नाही, पण दुसरी बातमी जाणून तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा... अनेकांनी कमेंट करत दिली प्रतिक्रिया...
अभिनेते धर्मेंद्र गेल्या अनेत वर्षांपासून बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. एककाळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांची चर्चा होती. आजही चाहत्यांमध्ये असलेली धर्मेंद्र यांची क्रेझ कमी झालेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील मध्यरात्री धर्मेंद्र यांनी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये धर्मेंद्र एका ट्रॅक्टरवर बसले आहे. ट्रॅक्टरवर बसून फोटो पोस्ट करत धर्मेंद्र यांनी चाहत्यांसोबत दोन बातम्या शेअर केल्या आहेत. पहिल्या पहिल्या बातमीबद्दल माहिती नाही, पण दुसरी बातमी जाणून तुम्ही देखील आनंदी व्हाल. धर्मेंद्र यांनी चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
View this post on Instagram
धर्मेंद्र फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने मी माझ्या शेतीमध्ये व्यस्त आहे. तुम्हाला सर्वांना खूप प्रेम… हा ट्रॅक्टर राजकोटच्या एका चाहत्याने भेट म्हणून दिला आहे.’ पुढे धर्मेंद्र यांनी त्यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगितलं आहे.
धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन याच्या ‘इक्कीस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. धर्मेंद्र यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धर्मेंद्र यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. त्यांच्या पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
धर्मेंद्र यांचे सिनेमे
नुकतात धर्मेंद्र अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. गेल्या वर्षी धर्मेंद्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. पण अभिनेत्री शबाना आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन होता. दोघांच्या किसिंग सीनची तुफान चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या किसिंग सीनचा विरोध देखील केला होता. आता पुन्हा धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.