Dharmendra | धर्मेंद्र झाले अत्यंत भावूक, थेट म्हणाले, मी असा बाप जो…
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. गदर 2 चित्रपटाने मोठी कमाई केलीये. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांनी घेऊन थेट विदेशात गेल्याचे दिसतंय.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. गदर हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, तोच जलवा चित्रपटाचा पुन्हा एकदा बघायला मिळाला. गदर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. इतकेच नाही तर गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल दिसला. गदर 2 नंतर सनी देओस याच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आल्या.
सनी देओल याने काही चित्रपट साईन केल्याचे देखील सांगितले गेले. मात्र, यावर मोठा खुलासा करण्यात आला. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याने आपल्या कुटुंबाला थोडे दिवस वेळ देण्याचे ठरवले. गदर 2 चित्रपटामध्ये तो इतका जास्त व्यस्त होता की, त्याला कुटुंबाला अजिबातच वेळ देत आला नाही. सनी देओल हा सध्या वडील धर्मेंद्र यांच्यासोबत विदेशात आहे.
धर्मेंद्र यांच्यावर विदेशात पुढील काही दिवस उपचार चालणार असल्याने तो विदेशात आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांसोबत मस्त पिझ्झा खाताना सनी देओल हा दिसला. यावेळी धर्मेंद्र आणि सनी देओल हे आनंदात दिसत होते. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर आता लेकाचे काैतुक करताना धर्मेंद्र हे दिसले आहेत. धर्मेंद्र यांची एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसतंय.
Dosto, qismat wala hota hai Baap woh…jis ka beta kabhi jab Baap ban kar bacchon sa laad ladata hai 💕💕💕💕💕🧿 Sunny brought me to USA to enjoy 😊the success of Gadar 2 ……Dosto, Great full to you all for your good wishes to make the Gadar 2 A block buster 🙏 pic.twitter.com/GRCsKsM40w
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 22, 2023
धर्मेंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मित्रांनो, भाग्यवान बाप तो असतो ज्याचा मुलगा कधी कधी बाप होतो आणि मुलांशी भांडतो. सनी देओल हा गदर 2 चित्रपटाच्या सक्सेसचा आनंद घेण्यासाठी मला घेऊन यूएसला आला. मित्रांनो, गदर 2 ला तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवल्याबद्दल तुमच्या शुभेच्छांबद्दल मी तुमचा नक्कीच आभारी आहे.
आता धर्मेंद्र यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सनी देओल याचा गदर 2 हिट ठरल्यानंतर धर्मेंद्र हे लेकाचे काैतुक करताना दिसत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सनी देओल याने गदर 2 चित्रपटाच्या यशानिमित्त खास पार्टीचे आयोजन मुंबईमध्ये केले होते.