Nuh Violence | ‘बस जल रही थी इंसानियत’; नुह हिंसाचारप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रिटी व्यक्त
गुरुग्राममध्ये जमावाने एका मशिदीवर हल्ला करून आग लागली. यात नायब इमाम या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जमावाने केलेल्या गोळीबारात दोघं जण जखमी झाले. गुरूग्रामच्या बादशाहपूर इथं मंगळवारी दुपारी हिंसक जमावाने एका भोजनालयाला आग लावली आणि त्याच्या लगतच्या दुकानांची तोडफोड केली.
गुरूग्राम/ नुह | 2 ऑगस्ट 2023 : हरियाणामधील नुह इथं सोमवारी सुरू झालेला हिंसाचार मंगळवारीही कायम होता. या दंगलीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 10 पोलिसांसह 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन होमगार्डचाही समावेश आहे. मंगळवारी गुरुग्राममधल्या एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 27 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. नुहमध्ये सुरू असलेला हिंसाचार थोपविण्यात प्रशासनाला यश आलं नाही. याप्रकरणी आता बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, सोनू सूद यांसारख्या कलाकारांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.
धर्मेंद्र यांनी स्वत:चा हात जोडलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘ये कहर क्यों, किस लिए? बक्श दे मालिक.. अब तो बक्श दे.. अब बर्दाश्त नहीं होता.’ आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी नुहमधील हिंसाचारावर दु:ख व्यक्त केलं. ‘अपने वतन में मुझे अमन सुकून भाईचारा चाहिए’, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
ना किसी का घर जला, ना किसी की दुकान, बस जल रही थी इंसानियत, देख रहा इंसान।
— sonu sood (@SonuSood) August 2, 2023
अभिनेता सोनू सूदनेही या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ना किसी का घर जला, ना किसी की दुकान, बस जल रही थी इंसानियत, देख रहा इंसान’, असं ट्विट त्याने केलं आहे. नुहमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दलं तैनात करण्यात आली आहेत. तिथल्या सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नुह आणि फरीदाबाद इथं बुधवारपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Apne watan mein Teri duniyan mein mujhe aman skoon bhaichara chahiye ?.
— Dharmendra Deol (@aapkadharam) August 2, 2023
गुरुग्राममध्ये जमावाने एका मशिदीवर हल्ला करून आग लागली. यात नायब इमाम या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जमावाने केलेल्या गोळीबारात दोघं जण जखमी झाले. गुरूग्रामच्या बादशाहपूर इथं मंगळवारी दुपारी हिंसक जमावाने एका भोजनालयाला आग लावली आणि त्याच्या लगतच्या दुकानांची तोडफोड केली. नुहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून हा हिंसाचार घडवून आणला गेला, असा आरोप हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केला.