Dharmendra | जेव्हा रक्तबंबाळ बॉबी देओलला धर्मेंद्र यांनी तात्काळ रुग्णालयात केलं दाखल; घरात कोणीच नव्हतं आणि…

घरात कोणीच नसतान बॉबी देओल याच्यासोबत घडली धक्कादायक घटना; रक्तबंबाळ अवस्थेत लेकाला पाहताच धर्मेंद्र यांनी घेतली रुग्णालयात धाव... सध्या सर्वत्र बॉबी देओल याची चर्चा...

Dharmendra | जेव्हा रक्तबंबाळ बॉबी देओलला धर्मेंद्र यांनी तात्काळ रुग्णालयात केलं दाखल; घरात कोणीच नव्हतं आणि...
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 2:56 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेते धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे आणि कुटुंबाबद्दल कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली प्रकाश कौर देखील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. पण आता धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता बॉबी देओल याच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. बॉबी देओल याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉबी देओल याच्यासोबत अशी एक घटना घडली होती, जेव्हा भडकलेल्या धर्मेंद्र यांनी केअर टेकरच्या कानशिलात लगावली आणि बॉबी देओल याला घेवून रुग्णालयात गेले. या घटनेला अनेक वर्ष झाली आहेत. पण त्या घटनेनंतर धर्मेंद्र यांनी कधीच बॉबी याला एकट्याला सोडलं नाही.

एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला होता की, अभिनेत्याचा सांभाळ मोठ्या सुरक्षित वातावरणात झाला होता. धर्मेंद्र यांनी कधीही बॉबी याला मित्रांसोबत देखील पार्टी करण्याची परवानगी दिली नाही. एका घटनेमुळे धर्मेंद्र यांना बॉबी देओल याची प्रचंड काळजी वाटायची.

बॉबी देओल जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हा अशी एक घटना घडली ज्यामुळे धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला. एकदा बॉबी देओल याची आई, आजी आणि बहिणी धर्मेंद्र यांचा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. बॉबी देओल याच्यासोबत वडील धर्मेंद्र आणि केअर टेकर होती.

घरात कोणी नसताना बॉबी खेळता – खेळता जमिनीवर पडला. तेव्हा धर्मेंद्र यांना मोठा आवाज आला आणि ते बेडरुममधून बाहेर आहे. बेडरुममधून बाहेर आल्यानंतर धर्मेंद्र यांना बॉबी देओल रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. अशा परिस्थितीत रागावलेल्या धर्मेंद्र यांनी केअर टेकरच्या कानशिलात लगावली आणि बॉबी याला घेवून रुग्णालयात गेले… ही घटना खुद्द बॉबी याने एका मुलाखतीत सांगितली होती..

पुढे बॉबी म्हणाला, ‘मी मोठा झालो तरी वडिलांच्या मनात एक भीती होती. मी बाहेर गेलो की मला इजा होईल… असा विचार करत वडिवांनी मला कधीच बाहेर जावू दिलं नाही.’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांची चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉबी देओल ‘आश्रम’ सिनेमामुळे चर्चेत आला होता.

बॉबी देओल याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या‘बरसात’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉबी याच्या करियरच्या सुरुवातीला असंख्या तरुणांमध्ये अभिनेत्याची क्रेझ होती. ‘बादल’, ‘बिच्छू’ आणि ‘एतराज’ यांसारख्या सिनेमांमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.