Dharmendra यांच्या पहिल्या पत्नीचं दुःख, हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्यानंतर म्हणाल्या, ‘मी सुंदर नाही पण…

धर्मेंद्र यांच्यासोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्या प्रकाश कौर; पतीने दुसरं लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर...

Dharmendra यांच्या पहिल्या पत्नीचं दुःख, हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्यानंतर म्हणाल्या, 'मी सुंदर नाही पण...
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 11:35 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा सिनेमांपेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे रंगलेली असते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी विवाहित असताना देखील दुसरं लग्न केलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते धर्मेंद्र. धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित होते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर (Who is Prakash Kaur) असं आहे. धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याबद्दल जेव्हा प्रकाश कौर यांना कळालं तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. पण प्रकाश यांनी कधीही धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्याचा विचार केला नाही. शिवाय सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Boby Deol) यांना देखील कधीही वडिलांपासून विभक्त केलं नाही.

धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याचा विचार केला, तेव्हा धर्मेंद्र यांचं आनंदी कुटुंब होतं. पतीने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश कौर यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण प्रकाश यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला नाही. प्रकाश यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून व्यतीत केलं.

धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांनी एक मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, ‘मी उच्च शिक्षित नाही, मी सुंदर देखील नाही. पण माझ्या मुलांसाठी मी जगात सर्वश्रेष्ठ महिला आहे आणि माझ्यासाठी माझी मुलं सर्वकाही आहे. मी माझ्या मुलांना खूप चांगल्याप्रकारे ओळखते आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की, ते कधीही कोणालाही त्रास देवू शकत नाहीत…’ असं प्रकाश कौर म्हणाल्या.

प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचं लग्न १९५४ साली झालं होतं. त्यावेळी प्रकाश कौर फक्त आणि फक्त १९ वर्षांच्या होत्या. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. त्यांच्या दोन मुलांची नावे सनी देओल आणि बॉबी देओल असून मुलीचं नावे अजीता देओल आणि विजेता देओल आहे. प्रकाश आणि धर्मेंद्र यांची दोन मुले प्रसिद्ध अभिनेते आहेत.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी

‘तुम हसीन मैं जवान’ सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९८० साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर आजपर्यंत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरी गेलेल्या नाहीत. दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासाठी नवं घर खरेदी केलं. धर्मेंद्र आणि हेमा यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींची नावे ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. हेमा मालिनी आणि प्रकाश कौर कधीही एकमेकांच्या समोर आल्यानंतर, पण दोघी एकमेकींचा आदर करतात.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.