Video | 87 व्या वयातही धर्मेंद्र यांचा जबरदस्त फिटनेस, अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का
धर्मेंद्र यांनी एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. धर्मेंद्र हे कायमच चर्चेत असतात. आपल्या पर्सनल लाईफबद्दल धर्मेंद्र चाहत्यांना अपडेट देताना दिसतात. धर्मेंद्र यांची मोठा चाहता वर्ग आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट यांच्यासोबत धर्मेंद्र हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. धर्मेंद्र हे कायमच चर्चेत असतात. धर्मेंद्र (Dharmendra) हे सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसतात. धर्मेंद्र यांनी एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले.
काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र हे विदेशात उपचार घेण्यासाठी गेले. यावेळी धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल हा देखील होता. यावेळी विदेशातील काही खास फोटो शेअर करण्यात आले. एका फोटोमध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल हा पिझ्झा पार्टी करताना दिसले. धर्मेंद्र यांनी एक पोस्ट शेअर करत सनी देओल याचे काैतुक देखील केले.
सनी देओल याने अगोदर स्पष्ट केले की, गदर 2 चित्रपटामध्ये सतत व्यस्त असल्याने काही दिवसांपासून कुटुंबियांना अजिबात वेळ देऊ शकलो नाही. यामुळे काही दिवस आता कुटुंबियांना वेळ देणार. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर आता सनी देओल याच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर असल्याचे सांगितले जातंय.
Friends, With love to you all. pic.twitter.com/ISKdA3ubgQ
— Dharmendra Deol (@aapkadharam) October 11, 2023
आता नुकताच धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. धर्मेंद्र यांचा व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ त्यांच्या फार्महाऊसवरील आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे चक्क व्यायाम करताना दिसत आहेत. यामुळेच चाहते हे हैराण झाले.
धर्मेंद्र यांचे वय 87 असून या वयातही धर्मेंद्र आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे धर्मेंद्र हे तब्बल 30 मिनिटांपासून सायकल चालवताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनीच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केलाय. धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन देखील दिले. लोक आता धर्मेंद्र यांच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्यांचे काैतुक करत आहेत.