‘धूम’ फेम सेलिब्रिटीचं धक्कादायक निधन; मॉर्निंग वॉकवेळी आला हृदयविकाराचा झटका

मॉर्निंग वॉकवेळी 'धूम'फेम सेलिब्रिटी अचानक कोसळला; रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं... सेलिब्रिटीच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं... असं म्हणायला हरकत नाही. कुटुंबावर देखील कोसळलं दुःखाचं डोंगर... आज होणार सेलिब्रिटीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

'धूम' फेम सेलिब्रिटीचं धक्कादायक निधन; मॉर्निंग वॉकवेळी आला हृदयविकाराचा झटका
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 1:01 PM

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांच्या निधनाची बातमी ताजी असताना बॉलिवूडमधून देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुपरहिट ‘धूम’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. रविवारी सकाळी संजय गढवी यांनी अखेरचा श्वास घेतला. लोखंडवाला बॅकरोडमध्ये संजय गढवी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना घाम येवू लागला.. संजय गढवी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तात्काळ कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संजय गढवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. संजय गढवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं… असं म्हणायला हरकत नाही.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मॉर्निंग वॉकवेळी संजय यांना हृदयविकाराचा झटका आला. ज्याठिकाणी संजय मॉर्निंग वॉक करत होते, तिथून हॉस्पिटलचं अंतर फक्त एक ते दीड किलोमीटर होतं. संजय यांना जेव्हा रुग्णालयात घेवून जाण्यात आलं तेव्हा रस्त्यावर ट्राफिक देखील नव्हती. संजय यांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच संजय गढवी यांनी अखेरचा श्वास घेतला.

रिपोर्टनुसार, संजय यांचे पार्थिव कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. 19 नोव्हेंबरला सायंकाळी उशिरा संजय गढवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. संजय गढवी यांच्या अंत्यसंस्कारसाठी अनेक सेलिब्रिटी हजर राहातील असं देखील सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

संजय गढवी यांच्या निधनावर मुलीची प्रतिक्रिया

वडिलांच्या निधनानंतर लेक संजना म्हणाली, ‘वडिलांना काहीही झालं नव्हतं. त्यांची प्रकृती उत्तम होती. पण रविवारी सकाळी त्यांचं निधन झालं…’ सध्या सर्वत्र संजय गढवी यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे. लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथील ग्रीन एकर सोसायटीत संजय गढवी राहतात, त्याच सोसायटीत श्रीदेवी देखील राहत होत्या.

काही दिवसांपूर्वी, संजय गढवी यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात देखील झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता सिनेमा बनवण्याचं संजय गढवी यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

‘धूम’ आणि ‘धूम 2’ सिनेमाचे दिग्दर्शक

संजय यांनी यशराज फिल्म्ससोबत जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन स्टारर ‘धूम’ आणि ‘धूम 2’ चं दिग्दर्शन केलं होतं. संजय यांनी मेरे यार की शादी है, तेरे लिए, किडनॅप, अजब गजब लव्ह आणि ऑपरेशन परिंदे यांसारख्या सिनेमांचं देखील दिग्दर्शन केलं होतं. संजय यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.