ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

परंपरांच्या पलीकडे जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने लग्न केलं आहे (Dia Mirza marriage).

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:17 AM

मुंबई : अनेक तरुणांचं आपापल्या लग्नाबाबत एक विशिष्ट असं मत असतं. खूप जल्लोषात लग्न करायचं, मांडवात प्रचंड गर्दी, फटाक्यांची आतिषबाजी, मोठमोठ्या लोकांची हजेरी, असं काहीसं अनेकांचं लग्नाबाबत स्वप्न असतं. मात्र, काही लोकांची मोजक्याच घरातील कुटुंबियांच्या समक्ष लग्न करायची इच्छा असते. हिंदू धर्मात लग्नाबाबत अनेक परंपरा आहेत. या परंपरांना काटेकोरपणे पाळलंदेखील जातं. मात्र, या परंपरांच्या पलीकडे जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने लग्न केलं आहे (Dia Mirza marriage).

दियाच्या विवाहात अनेक पारंपरिक चालिरिती पाळल्या गेल्या नाहीत. तिच्या लग्नाच्या विधीत कन्यादानदेखील झालं नाही. याशिवाय मंगलाष्टिका किंवा इतर विधीसाठी चक्क महिला भटजी बघायला मिळाली. त्यामुळे दियाचं लग्न सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. दियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत (Dia Mirza marriage).

दिया मिर्झाचा 15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत विवाह झाला. दोघांचं हे दुसरं लग्न होतं. या लग्नात अनेक नव्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांनी लग्नात जुन्या परंपरांना मागे सारुन अनेक नव्या गोष्टींचं अनुकरण केलं. विशेष म्हणजे दियाच्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नाही. याशिवाय इतर पारंपरिक चालिरितींना न पाळता दिया पतीसोबत सासरी गेली.

“गेल्या 19 वर्षांपासून मी ज्या बगिच्यात प्रत्येक संध्याकाळ एकांतात वेळ घालवत होती आज त्याच ठिकाणी माझा विवाहसोहळा पार पडला. खूप साध्या आणि आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. पर्यावरण पूरक असं नियोजन करण्यात आलं होतं. सजावटीत एकही प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर करण्यात आला नव्हता”, अशी माहिती दियाने इन्स्टाग्रामवर शेअर केली. दरम्यान, वैभवची पहिली पत्नी सुनैना रेखी हीने देखील नवविवाहीत दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.