Dia Mirza: ‘इज्जत धुळीस मिळाली’, दिया मिर्झा वैतागून असं का म्हणाली?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करत रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली आहे. दिया मिर्झा आणि सोनी राजदान यांनी रियाला पाठिंबा देत माफीची मागणी केली आहे.

सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकताच सीबीआयने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानंतर सीबीआयने रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिल्याचे सांगण्यात आले. आता रियाला बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळत आहे. दिया मिर्झा आणि आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी रियाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर तिला तुरुंगातही टाकण्यात आले. आता सीबीआयने तिला क्लीन चिट दिल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडने पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया देताना रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला. रियाला वाट्टेल तसे बोलणाऱ्यांना दियाने चांगलेच सुनावले आहे. रिया चक्रवर्तीचा एवढा छळ करणाऱ्यांची लेखी माफी मागितली पाहिजे, असे दिया म्हणाली.
वाचा: ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान




काय आहे दियाची पोस्ट?
‘जे कोणी त्यावेळी मीडियामध्ये होते त्यांनी आता रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांची लेखी माफी मागितली पाहिजे. कोणतेही कारण नसताना तुम्ही खोटे आरोप करुन तिला आणि तिच्या कुटुंबियांना त्रास दिला आहे. टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही हा त्रास दिला आहे. तुम्ही आता माफी मागावी. ही सर्वात छोटी गोष्ट आहे जी तुम्ही लोक आता करू शकता’ असे दिया मिर्झा म्हणाली.
काय म्हणाल्या सोनी राजदान
आलिया भट्टची आईही रिया चक्रवर्तीच्या समर्थन करताना दिसली.’जेव्हा गरीब मुलीला विनाकारण तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा तुम्ही या सगळ्याचा विचार केला होता का? तिची इज्जत धुळीस मिळवलीत. हे तर मॉर्डन जमान्यात विच हंट केल्यासारखे आहे. आता प्रश्न असा उपस्थित होते की तुमची जबाबदारी कुठे गेली? आता याची भरपाई कोण करणार’ या आशयाची पोस्ट सोनी राजदान यांनी केली आहे.
सीबीआयने दोन अहवाल
सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर सीबीआयने दोन वेगवेगळे अहवाल दाखल केल्याची माहिती आहे. एकामध्ये वडिलांनी मुलाला स्वत:ला संपवून टाकण्यासाठी प्रवृत्त केले, पैशांची उधळपट्टी आणि इतर अनेक आरोपांचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींविरोधात दाखल केला होता.