Raha Kapoor | आलिया भट्टने अखेर दाखवला मुलगी राहाचा चेहरा? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो पोस्ट होताचक्षणी नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राहा कपूर तर नाही ना, असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे.

Raha Kapoor | आलिया भट्टने अखेर दाखवला मुलगी राहाचा चेहरा? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 11:36 AM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलियाने त्यांच्या या मुलीचं नाव राहा असं ठेवलं. या नावाचा अर्थसुद्धा आलियाने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितला होता. मात्र रणबीर-आलियाने आजवर त्यांच्या मुलीचा चेहरा पापाराझींना किंवा माध्यमांना दाखवला नाही. आलिया आणि रणबीरच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. अशातच तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो पोस्ट होताचक्षणी नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राहा कपूर तर नाही ना, असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे. अवध्या 14 मिनिटांत या फोटोला 70 हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक चिमुकलं बाळ पहायला मिळतंय. या बाळाला गुलाबी रंगाचे कपडे परिधान करण्यात आले आहेत. त्यासोबत तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाचा बँड पहायला मिळतोय. ही सुंदर मुलगी आलिया-रणबीरचीच आहे का, असा प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत. ‘ही आलियाचीच मुलगी आहे का’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘माशाअल्लाह’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. या 6 फेब्रुवारीला रणबीर-आलियाची मुलगी तीन महिन्यांची झाली.

पहा फोटो

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

काय आहे फोटोमागील सत्य?

आलियाने पोस्ट केलेला बाळाचा हा फोटो पाहून अनेकांना तो राहा कपूरचाच असल्याचं वाटतंय. मात्र आलियाची ही पोस्ट तिच्या किड्स क्लोथिंग ब्रँडसाठीही आहे. आलियाने 2020 मध्ये ‘इद-ए-मम्मा’ हा लहान मुलांच्या आणि मॅटर्निटी कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. त्यामुळे बाळाचा हा फोटो नेमका राहाचा आहे की नाही, हे स्वत: आलियाच स्पष्ट करू शकेल.

एका सेकंदासाठी आम्हाला ती राहा कपूरच वाटली, किमान डिस्क्लेमर तरी द्यायचा होता, असंही नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये म्हटलंय. आलियाच्या या ब्रँडअंतर्गत 2 ते 14 वर्षांच्या मुला-मुलींचे कपडे विकले जातात. हा ब्रँड सध्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरही उपलब्ध झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.