अमिताभ बच्चन यांनी दाऊद इब्राहिमशी मिळवला होता हात? ‘त्या’ फोटोमागचं सत्य समोर आल्यानंतर…

Dawood Ibrahim : एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये दाऊद इब्राहिम याची दहशत होती. अनेक सेलिब्रिटींचे तेव्हा दाऊद इब्राहिम याच्यासोबत खास संबंध असल्याचं देखील अनेकदा समोर आलं, पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'हा' फोटो व्हायरल झाल्यानंतर माजली होती खळबळ...

अमिताभ बच्चन यांनी दाऊद इब्राहिमशी मिळवला होता हात? 'त्या' फोटोमागचं सत्य समोर आल्यानंतर...
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 3:07 PM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा झगमगत्या विश्वातील प्रत्येक गोष्टीत मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचाल हस्तक्षेप असायचा. कोणता सिनेमा करायचा, सिनेमात गाणं कोण गाणार, अभिनेता कोण असेल, अभिनेत्री कोण असेल… या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीचा निर्णय दाऊद इब्राहिम घ्यायचा. एवढंच नाही तर, भीती असल्यामुळे अनेक जण दाऊद इब्राहिम याची हाजी-हाजी करायचे… असं देखील अनेकदा समोर आलं. सुरुवातीला दाऊद इब्राहिम याचा बॉलिवूडसोबत काहीही संबंध नव्हता. पण जेव्हा बॉलिवूडचं व्यावसायीकरण होऊ लागलं, निर्माते, प्रायोजकांची संख्या वाढू लागली, व्यवसाय वाढू लागला तेव्हा दाऊद इब्राहिम याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला…

सांगायचं झालं तर, कधीच कोणत्याच सेलिब्रिटीने यावर स्पष्ट भूमिका मांडली नाही. पण अनेक सेलिब्रिटींचे दाऊद इब्राहिम याच्यासोबत खास संबंध होते. करीम लाला, छोटा राजन यांच्यासोबत सेलिब्रिटींचं खास संबंध होते. याच दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणारा दाऊद इब्राहिम असल्याची तुफान चर्चा रंगली होती. तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दाऊद इब्राहिम आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये खास संबंध असल्याची चर्चा रंगली होती. ज्यामुळे अमिताभ बच्चन यांनी टीकेचा सामना करावा लागाला होता. म्हणून अभिनेता अभिषेक बच्चन याने व्हायरल होत असलेल्या फोटोचं सत्य सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

अभिषेक बच्चन ट्विट करत म्हणाला, ‘फोटोमध्ये माझे वडील आणि माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण आहेत…’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिषेक याने स्पष्टीकरण दिल्यानंतर व्यक्ती फोटो डिलीट केला होता. सध्या ज्या फोटोची चर्चा रंगली आहे. तो फोटो 2010 मधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची प्रकृती

रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग करुन, त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याची देखील चर्चा रंगत आहे. दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तान येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, दाऊद इब्राहिम याची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती देखील समोर येत आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.