बिग बीसुद्धा ऐश्वर्यावर नाराज? अभिषेकसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनेला केलं अनफॉलो?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी सुनेला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे. एका रेडिट युजरने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्समध्ये बिग बी दिसत नसल्याने या चर्चांना उधाण आलं.
मुंबई : 6 डिसेंबर 2023 | फिल्म इंडस्ट्रीत बच्चन कुटुंबीय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचा नातू अगस्त्य नंदा हा ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अशातच अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन हे दोघं त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आता ‘रेडिट’ची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण बिग बी म्हणजेच ऐश्वर्याच्या सासऱ्यांनी तिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं त्यात म्हटलं गेलंय.
एका रेडिट युजरने पोस्ट शेअर करत प्रश्न विचारला आहे की, बिग बींनी ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलं आहे. यात काहींनी म्हटलंय की अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कधीच इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतच नव्हते. तर काहींनी पुन्हा एकदा अभिषेकसोबतच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. काहींनी प्रायव्हसी सेंटिंग केल्याचाही अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यामुळे बिग बींनी ऐश्वर्याला अनफॉलो केलं का, असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे.
View this post on Instagram
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंबीय नुकतेच ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला उपस्थित होते. यावेळी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे सर्वजण एकत्र दिसले. अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री होती. त्यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि 2006-2007 पर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या ही मुलगी आहे.