VIDEO: अंकिता लोखंडेने दिली ‘गुड न्यूज’? कंगनाच्या शोमध्ये उघड केलं गुपित

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही प्रकाशझोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही, असं म्हणायला हरकत नाही. अंकिता सध्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा तिच्या कामामुळे चर्चेत नाही. मात्र तिच्या खासगी आयुष्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे.

VIDEO: अंकिता लोखंडेने दिली 'गुड न्यूज'? कंगनाच्या शोमध्ये उघड केलं गुपित
Ankita Lokhande and Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 9:37 AM

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही प्रकाशझोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही, असं म्हणायला हरकत नाही. अंकिता सध्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा तिच्या कामामुळे चर्चेत नाही. मात्र तिच्या खासगी आयुष्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. मग ते विकी जैनसोबतचं लग्न असो किंवा मग नवीन घर घेणं असो. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अंकिताची अभिनेत्री कंगना रनौतशी (Kangana Ranaut) चांगली मैत्री झाली. याच मैत्रीखातर कंगनाने तिला तिच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित केलं. या शोमधील स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स चाहत्यांसमोर उघड करायचे असतात. मग कंगना अंकिताच्या बाबतीत ही संधी कशी सोडणार? कंगनाने अंकितालाही तिच्या खासगी आयुष्यातील गुपित विचारलं. त्यावर अंकिताने असा काही खुलासा केला, की ते ऐकून कंगनाला आश्चर्याचा धक्काच बसला. (Ankita Lokhande pregnancy)

कंगनाने अंकिताला तिचं गुपित उघड करायला सांगताच ती म्हणाली, “ठीक आहे, ही गोष्ट विकीलासुद्धा माहित नाही. मला शुभेच्छा द्या, मी गरोदर आहे”. हे ऐकून कंगनासह इतर स्पर्धकसुद्धा चकीत झाले. मात्र नंतर अंकिता हसत म्हणाली, “मी एप्रिल फूल केलं.” यावर कंगना तिला म्हणाली, “आज तर एक एप्रिलसुद्धा नाही. पण तुझं हे खोटं सिक्रेट लवकरच सत्यात बदलावं अशी मी आशा करते.”

पहा एपिसोडचा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

अंकिताने 14 डिसेंबर 2021 रोजी प्रियकर विकी जैनशी लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. अंकिता आणि विकी लवकरच त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार आहेत. लॉकडाउनमुळे या घराच्या इंटेरिअरचं काम रखडलं होतं. म्हणून तोपर्यंत अंकिताच्याच घरी घरजावई म्हणून राहत असल्याचं विकीने एका मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा:

Lock Upp: सोशल मीडिया अॅपद्वारे लोकांकडून 50 लाख रुपये लुटले; प्रसिद्ध मॉडेलचा खुलासा

Vicky-Katrina: ‘Location तरी सांगा’; विकी-कतरिनाचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.