बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या.

बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर
बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 12:54 PM

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बागबान’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की ‘बागबान’मध्ये चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्याची त्यांची इच्छाच नव्हती. मात्र आईच्या आग्रहाखातर त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती. चित्रपटाची कथा ऐकताना हेमा मालिनी यांच्यासोबतच त्यांच्या आईसुद्धा होत्या. त्यांनी कथा खूपच आवडली होती आणि म्हणूनच हेमाने नकार दिल्यानंतरही त्यांनी तो चित्रपट करण्याचा आग्रह केला. याच मुलाखतीत हेमा यांना या चित्रपटावरून झालेल्या आणखी एका चर्चेविषयी प्रश्न विचारण्यात आला.

‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा यांना विचारण्यात आलं की, “पती धर्मेंद्र यांनी तुमची आणि अमिताभ बच्चन यांच्यातील केमिस्ट्रीमुळे बागबान चित्रपट पाहण्यास नकार दिला होता का?” त्यावर हेमा मालिनी हसल्या आणि म्हणाल्या, “मला त्याबद्दल काहीच माहीत नाही.”रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’ या चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

हे सुद्धा वाचा

मोठ्या पडद्यापासून बराच काळ दूर राहिल्याने पुनरागमन करताना आईची भूमिका साकारावी का, याबद्दल हेमा मालिनी साशंक होत्या. रवी चोप्रा जेव्हा कथा सांगत होते तेव्हा हेमा यांच्या आई त्यांच्या बाजूलाच बसल्या होत्या. “चार मोठ्या मुलांच्या आईची भूमिका मी साकारावी असं ते म्हणतायत. हे कसं शक्य आहे”, असा सवाल हेमा यांनी कथा ऐकल्यावर त्यांच्या आईकडे केला होता. मात्र त्यांचा नकार असतानाही हेमा यांच्या आईने तो चित्रपट स्वीकारण्यासाठी आग्रह केला. त्यांना चित्रपटाची कथा फार आवडली होती.

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या. लग्नानंतर पती आणि पतीच्या कुटुंबापासून वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे समाजात स्त्रीवादी प्रतिमा कशी निर्माण झाली आणि तसं असूनही धर्मेंद्र यांनी कशी साथ दिली, याविषयी त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

“कोणालाच तसं राहायला आवडत नाही. पण कधी कधी घटना तशा घडतात. त्यामुळे जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. अन्यथा कोणालाच असं आयुष्य जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला पती, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंब हवं असतं. पण कुठेतरी गोष्टी हातापलीकडे गेल्या. पण मला त्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही किंवा त्याची तक्रार मी करत नाही. मी माझ्यासाठी खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींचं संगोपन मी उत्तमरित्या केलं”, असं त्या म्हणाल्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.