सुहानाची मुलाखत घेण्यास गौरी खानकडून साफ नकार; बळजबरी केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना अनुषाचं सडेतोड उत्तर

अनुषा दांडेकर ही अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकरची ती बहीण आहे. टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली होती.

सुहानाची मुलाखत घेण्यास गौरी खानकडून साफ नकार; बळजबरी केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना अनुषाचं सडेतोड उत्तर
गौरी-सुहाना खानसोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे अनुषा दांडेकर ट्रोलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 3:44 PM

मुंबई : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या तीन दिवसीय कार्यक्रमात अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. इतकंच नव्हे तर हॉलिवूडमधीलही नामांकित सेलिब्रिटी त्यानिमित्ताने भारतात आले होते. याच कार्यक्रमात अभिनेत्री शिबानी दांडेकरची बहीण अनुषा दांडेकर होस्ट म्हणून काम करत होती. या कार्यक्रमातील अनुषाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहानाशी बोलताना दिसत होती. अनुषाने मुलाखतीसाठी त्यांना विनंती केली होती, मात्र गौरीने तिला साफ नकार दिला. यावरून अनुषाला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. आता अनुषाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर

‘फक्त द्वेष करायचा आहे म्हणून किंवा अमुक एका व्यक्तीचे चाहते आहात म्हणून तुम्हाला मी कशी वाईट आहे हे दाखवायचं आहे. ट्रोल करणारी लोकं त्या कार्यक्रमातही नव्हती. पण माफ करा मी या तुमच्या प्लॅनचा भाग होऊ शकत नाही. काही लोकांना मुलाखती द्यायला आवडत नाहीत, किंवा त्यांनी कधीच मुलाखत दिलेली नसते आणि यात काहीच चुकीचं नाही. तर काहींना मुलाखती देण्याआधी त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागते. विषय इथेच संपला. माझ्या मते मी खूप चांगलं काम केलं आणि मी जे काम करते त्यात मी कुशल आहे. पण तुमच्याकडे मांडण्यासाठी इतकी मतं असतील तर माझं काम करण्यापासून तुम्हाला कोणीच रोखत नाहीये. मी तुमच्यासाठी आनंदाचीच अपेक्षा करते, जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांना कमीपणा दाखवणार नाही’, अशी पोस्ट तिने लिहिली.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वी तिने कुठेही मुलाखत देऊ नये, अशी भूमिका गौरीने घेतली. म्हणूनच तिने अनुषाला नकार दिला. त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी असाही अंदाज लावला की गौरीने अनुषासोबत फोटो काढण्यास नकार दिला. ‘आता नको, नंतर फोटो काढू.. असं म्हणून गौरीने तिचा अपमान केला’, असं एकाने लिहिलं होतं. तर मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्याकडे गेली मात्र स्वत:चाच अपमान करून बसली, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘अनुष्काला गौरीने भावच दिला नाही’, असंही एका युजरने लिहिलं होतं.

अनुषा दांडेकर ही अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकरची ती बहीण आहे. टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.