The Kerala Story मध्ये भूमिका साकारल्यानंतर देवोलीनाने मुस्लीम व्यक्तीशी केलं लग्न? काय आहे सत्य?
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करणार, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.
मुंबई : ‘साथ निभाना साथियाँ’ या लोकप्रिय मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. देवोलीनाने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात भूमिका साकारली आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने शाहनवाज शेखशी लग्न केलं, असं त्या पोस्टमध्ये म्हटलंय. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असतानाच देवोलीनाबद्दलची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मांतर केलं जातं, त्यांना कशा पद्धतीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं जातं, याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील आणखी एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, देवोलीनाला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट फक्त प्रचारकी असल्याचं वाटलं आणि त्यामुळेच तिने मुस्लीम व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या व्हायरल पोस्टमागील नेमकं सत्य काय हे जाणून घेऊयात..
5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इदनानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर देवोलीनाने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी 14 डिसेंबर 2022 रोजी लग्न केलं. तिने ‘द केरळ स्टोरी’मध्ये कोणतीच भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्ट केवळ अफवा आहेत.
शाहनवाजशी लग्न केल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना देवोलीनासुद्धा सडेतोड उत्तर देत आहे. ‘द केरळ स्टोरी या चित्रपटात मला काम करता आलं असतं तर आनंदच आहे. पण दुर्दैवाने मी त्यात नाही. तुम्ही फॅक्ट चेक करायला विसरलात की लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही नवीन पद्धत शोधून काढली आहे’, असा सवाल तिने ट्रोलर्सना केला. इतकंच नव्हे तर फेसबुकवरील काही पोस्टमध्ये देवोलीनच्या लग्नाचा जो फोटो दाखवण्यात आला आहे, त्यात सहअभिनेता विशाल सिंगलाच तिचा पती असल्याचं म्हटलंय. विशाल आणि देवोलीना यांनी ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
And one more thing i wish i could have been a part of kerela story. But my bad i wasn’t there. And you call yourself PATRAKAAR ? Fact check karna bhool gaye yaa attention paane ka naya tarika dhoondh nikaala hai.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 19, 2023
Din Raat kaunsa Nasha karte ho bhai tumlog ? ? Seriously i missed so much fun lately.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 19, 2023
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करणार, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.